ETV Bharat / city

राज्यातील प्राणी संग्रहालयात प्राण्यांची घेतली जाते काळजी, कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान! - महापालिका अपडेट न्यूज औरंगाबाद

सिद्धार्थ प्राणी संग्रहालय मराठवाड्यासह आसपासच्या शहरांमध्ये एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात 119 प्रजातीचे 350 प्राणी ठेवण्यात आलेले आहेत. यात वाघ, सिंह, हरीण, काळवीट, निल गाय, सांबर यांच्यासह सापांसाठी विशेष सर्पालय देखील आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी काही ठिकाणी स्प्रिंकलर लावण्यात आले आहेत. तर वाघ आणि सिंह यांना दोनवेळा अंघोळ घातली जात आहे. त्यामुळे प्राण्यांना उष्णेतेपासून बाधा होणार नाही, अशी खबरदारी घेतली जात

work
सिद्धार्थ प्राणी संग्रहालय
author img

By

Published : May 23, 2020, 1:28 PM IST

Updated : May 24, 2020, 7:17 PM IST

पुणे - दोन महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. देशभरातील प्राणिसंग्रहालय या काळात बंद आहेत. विदेशातील एका वाघाला कोरोनाचा लागण झाल्याची बातमी आल्याने राज्यातील विविध जिल्ह्यातील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी या काळात व्यवस्थित घेतली जात आहे. या बाबत ईटीव्ही भारतने घेतलेला खास आढावा....

प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 100 हुन अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक

प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या टिपल्या जातात हालचाली, घेतली जाते 'अशी' खबरदारी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, याची माहिती उपसंचालक डॉ. निघोटे यांनी दिली आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने प्राणिसंग्रहालयाचे उपसंचालक डॉ. निघोटे यांच्याशी संवाद साधला.

यावेळी माहिती देताना ते म्हणाले, की पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय 130 एकर परिसरात पसरले आहे. यात वाघ, सिंह, बिबटे, हत्ती यासारख्या 63 प्रजातींचे 440 हुन अधिक वन्यप्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचे दरवर्षी लसीकरण केले जाते. दर तीन महिन्यांनी या प्राण्यांना जंतनाशक औषधं दिली जातात. विष्ठा तपासली जाते. येथील प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 100 हुन अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्राण्यांचीही विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्राण्यांच्या दररोजच्या हालचाली टिपून ठेवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी या प्राण्यांना ठेवले जाते, त्यांचा वावर असलेला परिसर निर्जंतूक करण्यात आला आहे. जे कर्मचारी रेड झोन परिसरात राहण्यास आहेत, त्यांना रजा देण्यात आली. येथील प्राण्यांना दररोज दीड टन खाद्यपदार्थ लागतात. प्राण्यांना फिडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग केल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातो. प्राण्यांच्या खाद्यांना हात लावण्यापूर्वी हॅन्ड ग्लोज वापरणे, फेस मास्क वापरणे, गम बूट वापरणे, हात साबणाने धुणे हे सर्व केल्यानंतरच त्यांना प्राण्यांजवळ जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांची वाहने, खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही.

zoo-park
नागपूरचे मराहाजाबाग प्राणीसंग्रहालय

टाळेबंदीच्या काळात नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालय पर्यटकांशिवाय 'ओस'

विदर्भातील बच्चे कंपनी, आबालवृद्ध आणि तरुणाईच्या विरंगुळ्याच्या हक्काची जागा म्हणजे महाराजबाग प्राणी संग्रहालय. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालय पर्यटकांशिवाय ओस पडलेले आहे. कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग यासाठी कारणीभूत ठरला आहे.

विदर्भातील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने महाराजबागेत प्राण्यांसाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय प्राण्यांच्या शरीरातील तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे देखील मारले जात आहेत. त्यांना कोणतेही इन्फेक्शन होऊ नये, यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जात आहे. महाराजबागेत ऐकन 25 कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या काळातसुद्धा ते २५ कर्मचारी जबाबदारीने प्राण्यांची काळजी घेत असल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी डॉक्टर सुनील बावसकर यांनी दिली आहे.

महिनाभरापूर्वी अमेरिकेच्या न्यूयार्क येथील एका वाघाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर टायगर कॅपिटल असलेल्या नागपुरात गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्र आणि महाराज बाग प्राणी संग्रहालयात वाघांसह हरीण, बिबट्या, सांबरासह इतर प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. वन्य प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असल्याने एपिडेमिक डीजिस एक्ट 1897च्या अनुसार प्राणि संग्रहालय प्रशासनांने उपाय योजना केल्या आहेत.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात प्राण्यांची घेतली जाते काळजी, मात्र कर्मचाऱ्यांना अद्याप नाही वेतन

औरंगाबादमधील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये उन्हाळ्यात स्प्रिंक्लरने केले जाते प्राण्यांचे संरक्षण

लॉकडाऊनमुळे देशातील जवळपास सर्वच प्राणी संग्रहालय बंद आहेत. प्राण्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून प्राणी संग्रहालय बंद ठेवले असले, तरी प्राण्यांची खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबाद महापालिकेने प्राण्यांसह काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करून घेत विविध कोरोना बचावासाठी उपाय केले आहेत. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आले नसल्याने कर्मचारी तणावात आहेत.

औरंगाबादचे सिद्धार्थ प्राणी संग्रहालय 16 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले आहे. प्राण्यांची निगा राखणारे आणि मनपा अधिकारी यांच्याशिवाय कोणालाही संग्रहालयात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. प्राण्यांना योग्यवेळी भोजन दिले जात असून नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मनपा प्राणिसंग्रहालय अधिकाऱ्यांनी दिली.

औरंगाबादचे सिद्धार्थ प्राणी संग्रहालय मराठवाड्यासह आसपासच्या शहरांमध्ये एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात 119 प्रजातीचे 350 प्राणी ठेवण्यात आलेले आहेत. यात वाघ, सिंह, हरीण, काळवीट, निल गाय, सांबर यांच्यासह सापांसाठी विशेष सर्पालय देखील आहे. बच्चेकंपनीसह अबालवृद्धांच्या विरंगुळ्याठी या प्राणीसंग्रहालायचे विशेष आकर्षण होते. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येण्याची मुभा देण्यात आली असून आज घडीला 34 कर्मचारी प्राणीसंग्रहालयात काम करत आहेत. त्यापैकी 6 कर्मचारी रात्री तर इतर कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर सक्तीचे केले असून सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. प्राण्यांची वैद्यकीय तपासणी नियमित केली जात असून त्यांना योग्य आणि पौष्टिक भोजन दिले जात आहे. प्राण्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मनपा उद्यान अधिकाऱ्यांनी दिली.

उन्हाळ्यात प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी काही ठिकाणी स्प्रिंकलर लावण्यात आले आहेत. तर वाघ आणि सिंह यांना दोनवेळा अंघोळ घातली जात आहे. त्यामुळे प्राण्यांना उष्णेतेपासून बाधा होणार नाही, अशी खबरदारी घेतली जात असल्याचे उद्यान निरीक्षकांनी सांगितले आहे. प्राणिसंग्रहालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन मात्र वेळेत मिळत नसल्याने कर्मचारी निराश असल्याची सूत्रांनी सांगितली. मनपाच्या तिजोरीत येणारी आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक महिन्याला सात तारखेला त्यांचे वेतन होते, आता 21 तारीख होऊन गेली तरी अद्याप वेतन झाले नाही. तरी कर्मचारी पूर्ण जबाबदारीने काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Last Updated : May 24, 2020, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.