ETV Bharat / city

Ambadas Danve : 'मला शिंदे गटाकडून ऑफर, मात्र मी...'; अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट - अंबादास दानवे मराठी बातमी

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी गौप्सस्फोट केला आहे. मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Ekanth Shinde ) यांचा फोन आला होता, असे त्यांनी सांगितलं ( Mla Ambadas Danve On Shinde Group Offer ) आहे.

eknath shinde Ambadas Danve
eknath shinde Ambadas Danve
author img

By

Published : Jul 21, 2022, 4:52 PM IST

Updated : Jul 21, 2022, 7:18 PM IST

औरंगाबाद - मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Ekanth Shinde ) यांचा फोन आला होता, असा गौप्सस्फोट शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, तुम्ही जे माझ्यासाठी केले ते शिवसेना म्हणून केले. व्यक्तीगत थोडी केले, असे उत्तर दिल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटलं. शिवसेना मेळाव्यात अंबादास दानवे बोलत ( Mla Ambadas Danve On Shinde Group Offer ) होते.

शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू - शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने जोरदार पक्षबांधणी मेळावे घेण्यात येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या माध्यमातून मेळावे आणि बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. यामध्यामातून पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते जोडून ठेवण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान काही जण आपल्याला शिंदे गटात जाण्यासाठी पैशांची ऑफर आल्याचे देखील सांगत आहेत.

अंबादास दानवे कार्यकर्त्यांना संबोधित करताना

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी देखील बैठक आयोजित केली होता. यात मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. यावर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, तुम्ही जे माझ्यासाठी केले ते शिवसेना म्हणून केले व्यक्तीगत थोडी केले, असे उत्तर दिले. त्याबाबतचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला जात आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray : शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना, 'शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी...'

Last Updated : Jul 21, 2022, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.