ETV Bharat / city

Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना इशारा; 'शांत बसाव अन्यथा शिवसैनिक...' - चंद्रकांत खैरे मराठी बातमी

फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणं नाही. मात्र, अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खैरेंनी बंडखोर आमदारांना दिला ( chandrakant khaire warning shivsena rebel mla ) आहे.

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire
author img

By

Published : Aug 3, 2022, 3:55 PM IST

औरंगाबाद - आता फुटले आहात तर शिंदेंची तळी उचला आमच्या नेत्यांवर बोलू नका नाही तर, शिवसैनिकाला राग येतो ते सोडणार नाहीत तुम्हाला. उदय सामंत यांच्या गाडीवर याच कारणावरून हल्ला झाला, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. तर न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याकडून लागू द्यावा, यासाठी आपण देवाला साकड घालत असल्याचं खैरे यांनी ( chandrakant khaire warning shivsena rebel mla ) सांगितलं.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'शिवसेना नेत्यांबाबत काही बोलू नका' - उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा समर्थन करताना नाही. पण, हा हल्ला का होतो? याचा विचार करायला पाहिजे. फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. नेत्यांना उलट बोलला तर सहन केलं जाणार नाही. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणं नाही. मात्र, अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर परिणाम भोगावे लागतील. त्यात तानाजी सावंत म्हणतात की मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांच्या मागे मागे हा फिरायचा. तुम्ही शिक्षण सम्राट आहात म्हणून काय झालं. तुम्हालाही एक दिवस ईडी मागे लागेल. अशा कृत्यांमुळे शिवसैनिकांना राग येणारच, ते सोडणार नाही तुम्हाला, असा इशारा खैरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिला.

'न्यायालयाच्या निकालासाठी देवाकडे साकडे' - उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची पूर्ण माहिती रोज घेत असून, त्याबाबत कायदे तज्ञांशी रोज चर्चा देखील केली जाते. कपिल सिब्बल आणि इतर वकील उद्धव ठाकरे यांची चांगली बाजू मांडत आहे. त्यामुळे आपण देवाकडे प्रार्थना करत आहे. दक्षिणमुखी मारुती आणि जगदंबे जवळ आपण प्रार्थना करून साकडे घालत आहे. खरी शिवसेना कोणती आहे हे लवकरच समोर येईल. आदित्य ठाकरे यांच्या सभांना आता मोठी गर्दी होत आहे. देश विदेशातून उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, शिवसेनाच जिंकेल, असं मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा - Uday Samant Attack : भगवे मफलर घालून राष्ट्रवादीकडून उदय सामंतांवर हल्ला - गोपीचंद पडळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.