ETV Bharat / city

औरंगाबादेत शिवसेनेतर्फे ७ ठिकाणी 10 रुपयात जेवण - औरंगाबादेत जिल्ह्यात शिवसेनेतर्फे सात ठिकाणी 10 रुपयात जेवण

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात केलेल्या 10 रुपयात 'शिव भोजन' देण्याच्या घोषणेची औरंगाबादेत अंमलबजावणी. औरंगाबाद जिल्हा आणि शहरात सात ठिकाणी दहा रुपयात जेवण देण्यास सुरुवात.

ShivSena starts providing meal in ten rupees at Aurangabad
औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून १० रूपयात जेवण देण्यास सुरुवात
author img

By

Published : Dec 12, 2019, 5:01 PM IST

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात केलेल्या 10 रुपयात 'शिव भोजन' देण्याच्या घोषणेची औरंगाबादेत अंमलबजावणी करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात अडीच वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. याच प्रयोगाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेत राज्यात १० रुपयात जेवण सुरू करण्याची घोषणा केली होती.

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून १० रूपयात जेवण देण्यास सुरुवात

हेही वाचा... 'आसामच्या संस्कृतीला धक्का लागणार नाही", मोदींचे टि्वट

शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून १० रुपयात तीन पोळ्या, भाजी, लोणचे, भात, असे जेवण शिवसेनेतर्फे देण्यात येत आहे. जेवणामध्ये आठवड्याचे सात दिवस वेगवेगळे पदार्थ देत असल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा... मेळाव्याआधी चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंबरोबर चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारात गरिबांना 10 रुपयात जेवण देण्याची घोषणा केली. मात्र, अडीच वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग औरंगाबादेत सुरू करण्यात आला होता. गेली अडीच वर्षे औरंगाबादच्या मोंढा भागात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १० रुपयात शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. चांगल्या तूप आणि शुद्ध तेलाचा वापर करून भोजन तयार केले जाते. अडीच वर्षे यशस्वी प्रयोग केल्या नंतर रेल्वे स्थानक परिसरात शिव भोजन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा... HBD Rajinikanth: बस कंडक्टर ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव, वाचा रजनीकांत यांचा थक्क करणारा प्रवास

रोज दुपारी तीनशे लोकांसाठी हे भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. औरंगाबाद शहरात दोन ठिकाणी, तर ग्रामीण भागात पाच ठिकाणी शिवभोजन दिले जात असल्याची माहिती शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे यांनी दिली. शहरात येणाऱ्या प्रत्येकाला 10 रुपयात जेवण मिळावे, कोणीही उपाशी राहू नये यासाठी ही योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. बाजारात नाश्ता करायला देखील किमान 30 ते 40 रुपये लागतात. मात्र, अवघ्या 10 रुपयात उत्तम आणि पोटभर भोजन मिळत असल्याने गरिबांची आणि हातावर पोट भरणाऱ्या लोकांना नक्कीच दिलासा मिळत असून राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योजना सुरू करावी अशी इच्छा औरंगाबादच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Intro:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात घोषणा केलेल्या 10 रुपयात शिव भोजनाला औरंगाबादेत सुरुवात केली. औरंगाबाद शहरात अडीच वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. याच प्रयोगाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेत राज्यात दहा रुपयात जेवण सुरू करण्याची घोषणा केली होती.

Body:शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून दहा रुपयात तीन पोळ्या, भाजी, लोणचं, भात अस जेवण शिवसेनेतर्फे देण्यात येत आहे. जेवणामध्ये आठवड्याचे सात दिवस वेगवेगळे पदार्थ देत असल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Conclusion:शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारात गरिबांना 10 रुपयात जेवण देण्याची घोषणा केली. मात्र अडीच वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग औरंगाबादेत सुरू करण्यात आला होता. गेली अडीच वर्षे औरंगाबादच्या मोंढा भागात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा रुपयात शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. चांगल्या तूप आणि शुद्ध तेलाचा वापर करून भोजन तयार केले जाते. अडीच वर्षे यशस्वी प्रयोग केल्या नंतर रेल्वे स्टेशन परिसरात शिव भोजन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. रोज दुपारी तीनशे लोकांसाठी हे भोजन उपलब्ध करून दिल जात आहे. औरंगाबाद शहरात दोन ठिकाणी तर ग्रामीण भागात पाच ठिकाणी शिवभोजन दिल जात असल्याची माहिती शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे यांनी दिली. शहरात येणाऱ्या प्रत्येकाला 10 रुपयात जेवण मिळावं कोणीही उपाशी राहू नये यासाठी ही योजना सुरू केल्याची माहिती राजेंद्र दानवे यांनी दिली. बाजारात नाष्टा करायला देखील किमान 30 ते 40 रुपये लागतात मात्र अवघ्या 10 रुपयात उत्तम आणि पोटभर भोजन मिळत असल्याने गरिबांची आणि हातावर पोट भरणाऱ्या लोकांना नक्कीच दिलासा मिळत असून राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योजना सुरू करावी अशी इच्छा औरंगाबादच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
byte - राजेंद्र दानवे - शिवसेना उपशहर प्रमुख
byte - रवी पाचोने - नागरिक
byte - शेख वसीम - नागरिक

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.