औरंगाबाद - जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानी 647 पैकी 524 मते मिळवत एक हाती विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी 524, काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांना 106, शहानवाज खान 3 मिळवली, तर 14 मते बाद झाली. शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा 418 मतांनी विजयी झाला.
पक्षीय बलाबल -
शिवसेना | भाजप | काँग्रेस | राष्ट्रवादी | एमआयएम | इतर | एकूण |
141 | 189 | 170 | 80 | 28 | 49 | 657 |
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विक्रमी विजयाची नोंद झाली आहे. शिवसेनेच्या अंबादास दानवे यांना 647 मतांपैकी 524 मिळाली. एकूण 657 मतदारांपैकी 10 मतदार गैरहजर राहिल्याने 647 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. युतीचे 330 मत असताना एमआयएमसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदारांनी दानवे यांना मतदान केलं. त्यामुळे अंबादास यांना 524 अशी विक्रमी मिळवता आली. आघाडीची हक्काची 230 मत असूनही आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना अवघी 106 मत पडली. त्यामुळे पहिल्याच फेरीत अंबादास दानवे यांनी अर्ध्याहून अधिक मत मिळवल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
अब्दुल सत्तार यांनी वळवली काँग्रेसची मत -
लोकसभेत बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसची हक्काची मते शिवसेनेकडे वळवली. अब्दुल सत्तार यांनी जवळपास 103 मते शिवसेनेच्या पारड्यात पाडण्यात महत्वाची भूमिका बजवल्याचे बोलले जाते आहे. यामागे आगामी काळातली सत्तातरांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते आहे.
एमआयएमने केली कट्टर विरोधक शिवसेनेला मदत -
एमआयएम पक्ष शिवसेनेचा कट्टर विरोधक मानला जातो. औरंगाबाद महानगर पालिकेत सेने विरोधात भूमिका घेणाऱ्या एमआयएमने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकली. त्यामुळे अंबादास दानवे यांना विरोधात असलेली 28 मत एकगठ्ठा मिळाली.