औरंगाबाद - शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी गेलेल्या दूध डेअरीतील निवृत्त व्यवस्थापकचा बंगला फोडून तब्बल दोन लाखांची रोकड व काही मौल्यवान वस्तू चोरट्याने लंपास केल्याची ( Retired manager's house burglarized ) खळबळ जनक घटना गुरुसहानी नगर येथे उघडकीस आली.
शस्त्रक्रियेसाठी गेले होते जालन्याला -
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सुभाषचंद्र रामचंद्र बांगड (वय ६०) रा. धरती धन प्लाझा गुरुसहानी नगर हे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या दूध डेअरीमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते. दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी ते दि. २० रोजी जालन्याला गेले होते. शस्त्रक्रिया होणार असल्याने घरातील सर्व सदस्य जालना येथे गेले होते. दरम्यान सोबत कपडे घेऊन गेले नसल्याने रविवार दि. २१ रोजी मोठी मुलगी सुजाता आणि गोविंदा हे कपडे घेण्यासाठी घरी आले. यावेळी त्यांनी कपडे व इतर वस्तू घेऊन जालन्याला गेले.
शेजाऱ्यांनी केला फोन -
दरम्यान बांगड यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने ते जालन्याला गेले असल्याचे शेजाऱ्यांना माहीत होते. मात्र सोमवार दि. २२ रोजी पहाटे बांगड याचे घर कडी लावलेले दिसले. यामुळे शेजाऱ्यांनी सुजात यांना फोन करून घर व्यवस्थित लावेल नव्हते का? असे विचारले. यावेळी सुजाता यांनी चुलत भावाला घरी जाऊन बघण्यास सांगितले. यावेळी भावाने घरी जाऊन बघितले असता दरवाजा तुटलेला आढळून आला. तर घरातील समान अस्ताव्यस्त झालेले होते. ही बाब भावाने सुजाता यांना कळवली. यावेळी सुजाता या तात्काळ औरंगाबाद येथे आल्या. यावेळी घरातील दोन लाखांची रोख रकमा व काही मौल्यवान वस्तू घरात नसल्याचे आले. घटनेच माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस श्वान पथकासह दाखल झाले होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या बंटी - बबलीला बेड्या