ETV Bharat / city

खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा - edible oil prices

दिवाळीच्या तोंडावरतरी खाद्य तेलाचे भाव कमी व्हावेत अस नागरिकांना वाटत होते. गेली कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावासह गॅस, खाद्य तेलाचे भाव गगणला भिडले आहेत. यामध्ये कोणता सण आला तर तो सामान्य वर्गाला साजरा करता येऊ नये अशी परिस्थिती आहे. मात्र, दिवाळीत सुमारे ५ ते १० रुपयांनी खाद्य तेलाचे भाव उतरल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

खाद्यतेल
खाद्यतेल
author img

By

Published : Nov 5, 2021, 1:55 AM IST

औरंगाबाद - दिवाळीच्या तोंडावरतरी खाद्य तेलाचे भाव कमी व्हावेत अस नागरिकांना वाटत होते. गेली कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावासह गॅस, खाद्य तेलाचे भाव गगणला भिडले आहेत. यामध्ये कोणता सण आला तर तो सामान्य वर्गाला साजरा करता येऊ नये अशी परिस्थिती आहे. मात्र, दिवाळीत सुमारे ५ ते १० रुपयांनी खाद्य तेलाचे भाव उतरल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यामध्ये बाजारात पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाचे भाव उतरले आहेत. दरम्यान, येत्या काळात आणखी भाव कमी होण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याने दिवाळीचे फराळ गोड होणार आहे.

प्रतिक्रिया देताना नागिरक

दीड वर्षांपासून खाद्य तेलाच्या भाववाढीचा भडका उडाला

दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ 'तळण्यासाठी किराणा यादीत १५ ते २० लीटर खाद्यतेलाचा समावेश असतोच. मात्र, मागील दीड वर्षांपासून खाद्य तेलाच्या भाववाढीचा भडका उडाला आहे. करडी तेलाने लीटरमागे २०० रुपयांचा, तर अन्य तेलांनी दीडशेचा आकडा पार केला होता. वाढती महागाई रोखण्यासाठी अखेर दसऱ्याच्या दोन दिवस अगोदरच केंद्र सरकारने पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या कच्चा तेलात ३१ मार्च २०२२ पर्यंत कस्टम ड्युटी व कृषी उपकरमध्ये कपात जाहीर केली.

सोयाबीन तेल १० रुपयांनी घटून १३५ रुपये

कच्चा पाम तेलावर १७.५ टक्के आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर ५ टक्के कृषी उपकर लावण्यात येणार आहे. कस्टम ड्युटी कमी होऊन पाम तेल ८.२५ टक्के, सोयाबीन तेल ५.५, तर सूर्यफूल तेल ५.५ टक्केपर्यंत खाली आणले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर हळु-हळु दिसू लागला आहे. सोयाबीन तेल १० रुपयांनी घटून १३५ रुपये, ५ रुपये कमी होऊन पामतेल १३० रुपये, तर सूर्यफूल तेल १५० रुपये प्रतिलीटर विकत आहे. यात आणखी भाव कमी होतील.

तेलाच्या किमती

खाद्यतेल सोयाबीन तेल १३५रु

पामतेल- १३०रु

सूर्यफूल तेल- १५०रु

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.