ETV Bharat / city

औरंगाबादमधील म्हाडाच्या 864 घरांकरता 27 मार्चला सोडत; आजपासून ऑनलाइन नोंदणी - home buy opportunity in Aurangabad

औरंगाबादमधील म्हाडाच्या घरांची अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया आज सुरू झाली आहे. 18 मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर 27 मार्चला घरांसाठी सोडत निघणार आहे.

MHADA
म्हाडा
author img

By

Published : Mar 2, 2021, 7:16 PM IST

मुंबई - औरंगाबादमध्ये हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्याची प्रतीक्षा म्हाडाने आज संपवली आहे. औरंगाबाद मंडळातील 864 घरांसाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे. आजपासून या सोडतीसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे.

औरंगाबादमधील म्हाडाच्या घरांची अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया आज सुरू झाली आहे. 18 मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर 27 मार्चला घरांसाठी सोडत निघणार आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ६७९ रुपयांची घट ; चांदी १,८४७ रुपयांनी स्वस्त

औरंगाबाद आणि हिंगोलीत अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरे

औरंगाबाद आणि हिंगोलीत अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. अत्यल्प, अल्प आणि मध्यम या गटातील ही 864 घरे आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) पडेगाव (औरंगाबाद) येथे 368 घरे, हिंगोली येथे 132 घरे सोडतीत समाविष्ट आहेत. तर 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी देवळाई (जि. औरंगाबाद) येथे 7 घरांचा सोडतीत समावेश आहे. तर अल्प उत्पन्न गटाकरिता देवळाई ( औरंगाबाद) येथे 12 घरे, सहानुरवाडी (औरंगाबाद) येथे 28 घरे, सातारा (औरंगाबाद) येथे 76 घरे, देवळाई (औरंगाबाद) येथे 23 घरे आणि हर्सूल ( औरंगाबाद) येथे 2 घरे सोडतीत समाविष्ट आहेत. त्याचवेळी
म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी हिंगोली येथे 48 घरे तर मध्यम उत्पन्न गटासाठी पडेगाव ( औरंगाबाद) येथे 168 घरे विक्रीसाठी लॉटरीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा आठवा क्रमांक

इतकी अनामत रक्कम भरावी लागणार

म्हाडाच्या घरासाठी नोंदणी झाल्यानंतर लगेचच अर्ज भरून सादरही करता येणार आहे. दरम्यान 18 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर 19 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तर 27 मार्चला औरंगाबाद भवन येथे सोडत निघणार आहे. दरम्यान, अत्यल्प गटासाठी 25 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न असणे गरजेचे आहे. या गटाला 5 हजार रुपये अनामत रक्कम असणार आहे. तर अत्यल्प गटासाठी 25,001 ते 50,000 रुपये असे मासिक उत्पन्नाची अट आहे. यासाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. 50, 001 ते 75, 000 रुपये अशी उत्पन्न मर्यादा मध्यम गटासाठी आहे. या गटाला 15 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

दरम्यान, म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीची अजूनही प्रतीक्षाच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.