औरंगाबाद - आज मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad Sabha ) यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्द्याचा पुनर्रुच्चार केला. उत्तर प्रदेशात जर लाऊडस्पिकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का उतरवले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, राज ठाकरे यांचे भाषण सुरू असताना अजान सुरू झाल्याने राज ठाकरे ( Raj Thackeray Get Angry ) चांगलेच संतापल्याचे बघायलाय मिळाले.
औरंगाबादमध्ये सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर आज राज ठाकरे यांचे भाषण सुरू होते. यावेळी ते मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलत असताना, अचानक अजान सुरू झाल्यानंतर राज ठाकरे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. जर सभेच्या वेळी अजान सुरु होणार असेल, तर आपण ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा किंवा आताच्या आता हा आवाज बंद करावा, असे राज ठाकरे म्हणाले. जर हे सरळ भाषेत समजून घेत नसतील, तर जे काय व्हायचे आहे, ते होऊन जाऊ द्या. अभी नही तो कभी नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
दरम्यान, त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 4 मे चा अल्टीमेटम दिला. औरंगाबादमध्ये 600 मशिदी आहेत. बांगेची येथे कॉन्सर्ट चालते का? देशातील सगळ्या मशिदींवरील लाऊडस्पिकर उतरले पाहिजे. सर्वांना समान नियम असला पाहिजे. तुम्हाला कोणी अधिकार दिला रस्त्यावर येण्याचा. रस्त्यावर येऊन नमाज पढला जात आहे. माझी शासनाला विनंती आहे. तीन तारखेला ईद आहे. मला त्यांच्या सणात कुठल्याही प्रकारचे विष कालवायचे नाही. चार तारखे पासून भोंगे उतरले पाहिजे, त्यानंतर आम्ही ऐकणार नाही. मशिदीसमोर हनुमान चालीस लाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा - Raj Thackeray on Sharad Pawar : शरद पवार हे नास्तिकच - राज ठाकरे