औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण समोर आल्यानंतर लवकरच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे समीकरण (Shiv Sena Vanchit Bahujan Aghadi alliance) सुरू व्हावं, असे संकेत देण्यात आले आहेत. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना त्याबाबत पत्र दिल्याचं समोर आलं (Prakash Ambedkar letter to Uddhav Thackeray) आहे, असं झाल्यास निश्चितच शिवसेनेला फायदा होईल, असं मत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलं.
नव्या समिकरणाला राष्ट्रवादी अडचण - वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्या युतीबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मात्र त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाची अडचण युतीला येईल, असे संकेत देखील वंचितकडून (Vanchit Bahujan Aghadi) देण्यात आले आहेत. शिवसेनेसोबत भाजप सोबत असल्याने शिवसेनेसोबत जाणे शक्य नव्हते. मात्र आता शिवसेना वेगळी झाल्याने त्यांच्यासोबत जाण्यात हरकत नाही. मात्र त्यांनी राष्ट्रवादीसोबत राहू नये, असं देखील वंचित कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावला राष्ट्रवादी अडसर ठरेल असे संकेत मिळत आहेत.
वरिष्ठ नेते घेतील निर्णय - राज्य स्थापन होणाऱ्या नवीन समीकरणाबाबत शिवसेना नेत्यांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. प्रस्ताव आहे, मात्र त्यासंबंधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे वरच्या पातळीवर निर्णय घेतील. मात्र ही युती झाल्यास निश्चित त्याचा फायदा पक्षांना होईल आणि असं झालं, तर नवी ऊर्जा मिळेल असं मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं.
चंद्रकांत पाटीलांचे आभार - दोन वर्ष भाजप महाविकास आघाडीच सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. हे प्रत्यक्ष चंद्रकांत दादा यांनी कबूलत केले आहे. एकनाथ शिंदे एवढे पैसे देऊ शकत नाही, भाजपाने स्पॉन्सर केलं हे स्पष्ट आहे. ही कबुली दिल्या बदल चंद्रकांत पाटील यांचे आभार, अशी खोचक टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.