ETV Bharat / city

राज्यात जनतेचे सरकार, चारशे निर्णय घेतले - एकनाथ शिंदे - शिंदे म्हणाले मी भाग्यवान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात जनतेचे सरकार असल्याचे म्हटले आहे (Peoples government in Maharashtra). त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आत्तापर्यंत आम्ही 400 हून अधिक निर्णय घेऊ शकलो (CM Shinde four hundred decisions taken). विशेष म्हणजे राज्यात 75 हजार पदांची भरत भरती करत आहे. जी पदे आधीपासूनच मंजूर आहेत ती भरण्यात येत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे दिली.

राज्यात जनतेचे सरकार
राज्यात जनतेचे सरकार
author img

By

Published : Sep 16, 2022, 7:37 PM IST

औरंगाबाद - हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे ((Peoples government in Maharashtra)). आत्तापर्यंत आम्ही 400 हून अधिक निर्णय घेऊ शकलो (CM Shinde four hundred decisions taken). विशेष म्हणजे राज्यात 75 हजार पदांची भरत भरती करत आहे. जी पदे आधीपासूनच मंजूर आहेत ती भरण्यात येत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे दिली.

शिंदे म्हणाले मी भाग्यवान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. यावेळी बोलताना मी भाग्यवान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उभारण्यात आलेले हे विद्यापीठ ज्ञानदानाचे काम करते आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्या ठिकाणी मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तर संत पीठाचे काम हे सुरू झालेले आहे. विद्यापीठामार्फत अनेक विषयाचे ज्ञान दिले जाते. ज्ञानदानाचे केंद्र असल्याने आम्ही नेहमी विद्यापीठासोबत राहू, लवकरच संतपीठासाठी पैसे देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाराजांनीच मांडली होती मंत्रिमंडळाची संकल्पना - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि हा पूर्ण परिसर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. शिक्षणाचा हा आता मोठा वटवृक्ष झालाय. याच आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याचा मला आनंद आहे. खरंतर त्याकाळी अष्टप्रधान मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळाची संकल्पना ही महाराजांनीच पुढे आणली आणि त्याच आधारावर आता पुढे काम सुरू आहे. महाराजांमध्ये एक वेगळी दैवी शक्ती होती. बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळेच नौदलात विक्रांत दाखल झाली, त्यावेळी ध्वजावर राजमुद्रेला स्थान देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हा विद्यापीठ परिसराचा सौंदर्य वाढवणार आहे. एक वेगळा इतिहास या निमित्ताने उभा राहील. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून या पुतळ्याकडे पाहिले जाईल. या ठिकाणचे पावित्र्य राखले जाईल असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.