ETV Bharat / city

औरंगाबादेत क्रेडिट कार्डचे बिल थकल्याने वसुली एजन्सीकडून महिलेशी अश्लील वर्तन

author img

By

Published : Aug 4, 2021, 5:17 PM IST

क्रेडिट कार्डचे थकीत देयक मागताना महिलेला शरीर सुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला. 20 हजाराचे देयक थकल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांचा छळ करण्यात आला. इतकंच नाही तर पोलिसांनी मदत करण्याऐवजी तक्रारदाराच्या पैश्यांवर वैष्णव देवीची यात्रा केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

क्रेडिट कार्ड देयक थकल्याने वसुली एजन्सीने महिलेला अश्लील वर्तन.

औरंगाबाद - क्रेडिट कार्डचे थकीत देयक मागताना महिलेला शरीर सुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला. 20 हजाराचे देयक थकल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांचा छळ करण्यात आला. इतकंच नाही तर पोलिसांनी मदत करण्याऐवजी तक्रारदाराच्या पैश्यांवर वैष्णव देवीची यात्रा केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पीडित कुटुंबियांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

औरंगाबादेत क्रेडिट कार्डचे बिल थकल्याने वसुली एजन्सीकडून महिलेशी अश्लील वर्तन

लॉकडाऊनमुळे थकले कार्ड देयक -

औरंगाबादच्या महिलेने 2019 मध्ये एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरून 46 हजारांची खरेदी केली. त्याचे देयक म्हणून त्यांनी 25 हजार रुपये बिलापोटी अदा केले. उर्वरित रक्कम लवकर भरेल असे महिलेने वसुली अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र त्यानंतरही वसुली एजन्सीने महिलेला फोनवर त्रास द्यायला सुरुवात केली. त्यात लॉकडाऊन लागल्याने सध्या पैसे भरणे शक्य नसल्याचे त्यांनी बँक वसुली एजन्सीला सांगितले. मात्र त्यानंतर सतत येणाऱ्या वसुली एजंटच्या फोनमुळे त्रास वाढत गेला. इतकंच नाही तर वसुली एजंट अश्लील भाषेत बोलू लागल्याने महिलेला मानसिक त्रास झाला.

महिलेशी अश्लील वर्तन -

क्रेडिट कार्ड देण्यासाठी वारंवार फोन करून अनेक प्रकारच्या योजना अत्यंत मधुर भाषेत सांगितल्या जातात. त्यावेळी सुशिक्षित वाटणारे लोक मात्र वसुलीसाठी फोन करतात त्यावेळी सौजन्याची ऐशी तैशी करतात याचा प्रत्यय सिडको भागात राहणाऱ्या महिलेला आला. क्रेडिट कार्डचे थकीत देयक असल्याने महिलेला अतिशय अश्लील भाषा वापरली गेली. महिलेच्या चारित्र्यावर भाष्य करत वसुली एजंटने चक्क शरीर सुखाची मागणी केली. त्यामुळे महिलेला मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली.

नातेवाईकांना फोन करून केली बदनामी -

क्रेडिट कार्डचे थकीत पैसे देताना अश्लील भाषा वापरल्याने त्रस्त झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी वसुली अधिकाऱ्यांचे फोन उचलणे बंद केले. त्यावेळी वसुली एजन्सीच्या लोकांनी महिलेच्या फेसबुक अकाउंट वरून नातेवाईकांचे फोन नंबर घेऊन त्यांना फोन करून सदरील महिला आणि तिचे कुटुंबीय चोर असून त्यांनी क्रेडिट कार्डचे पैसे थकवल्याचे सांगितले. त्यामळे महिलेच्या कुटुंबियांची बदनामी झाली. इतकंच नाही तर महिलेच्या वडिलांना फोन करून "अशी मुलगी का पैदा केली" अस म्हणत गैरवर्तन करून महिलेच्या चरित्र्याबाबत अश्लील भाषा वापरली. असा आरोप महिलेने केला आहे. त्याबाबत मोबाईल संभाषण रेकॉर्डिंग, आलेले अश्लील मेसेज घेत महिलेच्या कुटुंबियाने पोलिसात धाव घेतली.

पोलिसांनी मदतीच्या नावाखाली केली वैष्णव देवी यात्रा -

पीडित महिलेच्या पतीने याबाबत फेब्रुवारी 2021 मध्ये सिडको एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्याबाबत गंभीर गुन्हा दाखल केले नाहीत, असा आरोप पीडितेच्या पतीने केला. जुलै महिन्यात आरोपी दिल्लीत असून त्याला आणण्यासाठी जावं लागेल. असे म्हणत पीडितेच्या पतीला सोबत घेत दिल्ली गाठली. एक दिवस संबंधित एजन्सी चालकाच्या कार्यालयात चर्चा केल्यावर वैष्णव देवीला जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढायला लावत धार्मिक यात्रा पोलिसांनी करून घेतली. याचा सर्व खर्च पीडितेच्या पतीकडून घेण्यात आला. इतकं करूनही आरोपीला अटक केली नसल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी मदत न करता त्रास दिला असा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला.

चौकशी करून माहिती देऊ -

सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी तक्रारीबाबत दखल घेतली नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्यावर याबाबत प्रकारणी चौकशी सुरू केली असून चौकशी झाल्यावर याबाबत माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा - दोन नवऱ्यांची बायको, काकाला अंधारात ठेवून पुतण्याचं काकूसोबत लग्न, वाचा रंजक घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.