औरंगाबाद - ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा फायदा मोजकेच लोक घेत आहेत. यामुळे ओबीसी समाजातील गरजू लोकांना या आरक्षणाचा फायदा मिळत नाही. यासाठी सरकारने ओबीसी समाजातील अतिमागास समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. तर आंदोलन करावेच लागेल, असे अखील भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर यांनी सांगितले.
'ओबीसी प्रश्न सरळ मार्गाने सुटत नसेल, तर आंदोलन करावेच लागेल'
अखील भारतीय तैलिक साहू महासभा दिल्ली अंतर्गत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा मराठवाडा विभागाची रविवारी दि.१८ रोजी बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होेते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्यापुर्वी ओबीसी समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याचा आमचा ठराव झाला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसी प्रश्न सरळ मार्गाने सुटत नसेल तर त्यासाठी आंदोलन करावेच लागेल. असे देखील क्षिरसागर म्हणाले. मराठा समाजात अनेकांची आर्थिक परिस्थीती नाजुक आहे. त्यामुळे या समाजाला देखील आरक्षण मिळावे, अशी आमची भुमिका आहे. मात्र आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे देखील क्षिरसागर म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी मराठलाड्याकडे वळवा -
मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न महत्वाचा आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवल्यास मराठवाड्यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील. यासाठी आम्ही हा प्रश्न मंत्रिमंडळात देखील मांडला आहे. मंत्रिमंडळाने या प्रश्नाला मंजुरी देखील दिली असल्याचे क्षिरसागर म्हणाले. यासाठी १८ हजार कोटींचा खर्च येण्याचा अंदाज देखील आहे.
हेही वाचा - कुत्री सोडल्यासारखी तपास यंत्रणा सोडलीय, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका