ETV Bharat / city

Navratri 2022 : नवरात्री विशेष; पर्यावरणाच्या बचावासाठी झटणारी औरंगाबादची नवदुर्गा

दीपशिखा फाउंडेशनच्या ( Deepshikha Foundation Aurangabad ) मनीषा चौधरी ( Manisha Chaudhary Aurangabad ) यांनी गेल्या काही वर्षात निसर्ग वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. तर आज नवरात्री विशेष मध्ये पर्यावरणाच्या बचावासाठी झटणारी औरंगाबादची नवदुर्गा ( Navadurga of Aurangabad ) विषयी जाणून घेऊयात.

Navratri special
औरंगाबादची नवदुर्गा
author img

By

Published : Oct 1, 2022, 1:16 PM IST

औरंगाबाद - एखादे ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असते. असेच काहीसे प्रयत्न पर्यावरण बचावासाठी केले ते दीपशिखा फाउंडेशनच्या ( Deepshikha Foundation Aurangabad ) मनीषा चौधरी ( Manisha Chaudhary Aurangabad ) यांनी. गेल्या काही वर्षात निसर्ग वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. जास्त मनुष्यबळ नसताना एकटेच आत्तापर्यंत तीन लाख लोकांपर्यंत जनजागृती मोहीम पोहचवण्याचे काम त्यांनी केले. ( Navadurga of Aurangabad )

पर्यावरणाच्या बचावासाठी झटणारी औरंगाबादची नवदुर्गा

गणेश उत्सवाला केले लक्ष : पर्यावरणाला हानी पोहचू नये याकरिता मनीषा चौधरी यांनी १२ वर्षांपूर्वी काम सुरू केले. मुलांना गणेश उत्सव साजरा करायचा होता, पर्यावरणाला हानी होईल म्हणून उत्सव साजरा करू दिला नाही. त्यावेळी शाडू माती पासुन गणेश मूर्ती तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर लहान मुलांमध्ये जनजागृती करावी असा विचार करून शाळांमधे जाऊन माहिती देण्याचा निर्धार त्यांनी केला आणि नव्या मोहिमेला सुरुवात केली अशी माहिती मनीषा चौधरी यांनी दिली.

शाळांमधे केले जनजागृती : गणेश उत्सव साजरा करत असताना प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती चिंतेची बाब मानल्या जातात. उत्सव साजरा करताना निसर्गाला हानी पोहचू नये याकरिता मनीषा चौधरी यांनी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. गेल्या तेरा वर्षांमध्ये त्यांनी शाळेत जाऊन लहान मुलांना शाडू माती पासुन गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याकडे भर दिला. सुरुवातीला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे अवघड होते. मात्र आता दरवर्षी अनेक शाळा स्वत संपर्क करून बोलावतात. आता पर्यंत दीड ते दोन लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्याची माहिती मनीषा चौधरी यांनी दिली.

वृक्ष लागवड बाबत केले कार्य : पर्यावरण वाचवताना वृक्ष महत्त्वाचा घटक आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वृक्ष संवर्धन बाबत जागृती करण्याची आवश्यकता असल्याची बाब लक्षात आल्याने लहान मुलांमधे झाडांचे महत्त्व, संवर्धन, करण्याबाबत तर झाड नसतील तर होणारे परिणाम याबाबत माहिती देण्याचे काम केले. दीपशिखा फाऊंडेशन मधे मनुष्यबळ कमी आहे मात्र त्यांनी एकट्यानेच जनजागृती मोहीम हाती घेतली असून सातत्याने प्रयत्न केल्याने काहीअंशी यश मिळाल्याचे समाधान मनीषा चौधरी यांनी व्यक्त केले.

महिलांना केले जागरूक : शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यात सॅनिटरी पॅड पासून होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पर्यावरणास मोठी हानी होते. त्यामुळे सॅनिटरी पॅड पेक्षा कप वापरावा यासाठी काही वर्षात मोहीम राबवली. वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या कार्यशाळा घेतल्या. सॅनिटरी पॅडचे दुष्परिणाम समजून सांगितले. आता पर्यंत हजारो महिलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला असल्याचं मनीषा चौधरी ( Manisha Chaudhary ) यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.