औरंगाबाद - सिल्लोड जळगाव महामार्गावरील जगप्रसिद्ध अजिंठा घाट ( St bus Caught fire in Ajanta Ghat ) चढत असताना एसटी महामंडळाच्या मुक्ताईनगर - औरंगाबाद बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने बसमध्ये प्रवास करीत असलेले सुमारे 40 ते 45 प्रवाशी बसच्या खाली उतरल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असून, पोलीस आणि ग्रामस्थांनी टँकरच्या साहायाने आग आटोक्यात आणली.
हेही वाचा - Aurangabad Freestyle : व्हाट्सअॅप स्टेटसवरून दोन गटात वाद, हाणामारीत एक गंभीर तर दोन जखमी
मुक्ताईनगर डेपोची एस.टी महामडळाची मुक्ताईनगर - औरंगाबाद (एमएच 14 बीटी 1652) ही एसटी बस सुमारे 40 ते 45 प्रवाशी घेऊन रविवारी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास अजिंठा घाट चढत होती. पोलीस वायरलेस वळणाजवळ चालकाच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस बाजूला घेतली सुदैवाने प्रवाशी बसच्या खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच जवळ असलेल्या पवन हॉटेलचे मालक समी चाऊस, फकिरा पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, बिटजमादार अक्रम पठाण, संजय ब्राम्हणदे यांच्यासह रवी माहोर, सुजित गुप्ता आदी ग्रामस्थानी टँकरने आग आकोट्यात आणली. बॅटरी बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - Aurangabad IPL Match Betting : पोलिसांच्या कारवाईनंतरही वैजापूरमध्ये खेळला जातो खुलेआम सट्टा