औरंगाबाद - बंगाल निवडणुकीचा निकाल सर्वांसाठी आनंददायी आहे. कारण या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा आलेख उतरणीला आल्याचे वक्तव्य एमआयएमचे प्रवक्ते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील म्हणाले, की बंगालच्या निवडणुकीत आम्ही सहभागी होणार होतो. मात्र, कोरोनामुळे आम्ही सहभागी झालो नाही. इकडे रुग्णांना सुविधा नसल्याने आम्ही त्यांच्या मदतीसाठी काम करत आहोत.
हेही वाचा-गोकुळ निवडणुकीसाठी 99.78 टक्के मतदान; कौल कोणाला? याकडे सर्वांच्या नजरा
हाच मोदीजी आणि आमच्यात फरक
आम्ही निवडणुकीपेक्षा कोविडला महत्त्व दिले. मोदीजी गेले त्यांनी प्रचार केला. आम्ही शेवटच्या क्षणी काही उमेदवार उभे केले. मात्र, आमचे वरिष्ठ नेते जाऊ शकले नाहीत. इकडे कोरोनामुळे लोकांचे हाल सुरू होते. बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर मिळत नव्हते. ते मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णलयात जाऊन आम्ही रुग्णांचे प्रश्न सोडविले. हाच मोदीजी आणि आमच्यात फरक असल्याची टोलेबाजी इम्तियाज जलील यांनी केली.
हेही वाचा-स्तुत्य उपक्रम! उरणच्या कोव्हिड सेंटरमध्ये 30 खासगी डॉक्टर देणार विनामूल्य सेवा!
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला निर्विवाद यश!
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सत्ता राखण्यात यश मिळालेआहे. २००हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला केवळ ७५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजूनही भाजपा दोन ठिकाणी आघाडीवर आहे. दरम्यान, डाव्यांसाठी हा मोठा पराभव आहे. डाव्या पक्षांचा गड समजला जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.