औरंगाबाद - भाजपला अडवण्यासाठी आम्ही कोणासोबतही आघाडी करायला तयार असून, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on proposal to join maha vikas aghadi ) यांनी सांगितली.
हेही वाचा - MLA Ramesh Boranare : शिवसेना आमदारावर विनयभंगाच्या प्रकरणात गुन्ह्या; शिवसैनिक उतरले रस्त्यावर
भाजपमुळे होतो आरोप...
देशात कुठेही निवडणूक झाली आणि त्यात भाजप विजयी झाले तर, त्याला एमआयएम कारणीभूत असल्याचा आरोप केला जातो. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विजयी झाला त्याला देखील एमआयएमला कारणीभूत धरले जात आहे. नेहमी भाजपची बी टीम म्हणून हिनवले जाते. त्यामुळे, राजेश टोपे यांची भेट झाली त्यावेळी भाजपला थांबवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहे. तीन चाकी रिक्षाची आम्हाला सोबत घेऊन कार करा, असा प्रस्ताव दिल्याचे जलील यांनी सांगितले.
संभाजी भिडे कसाब सारखे.....
संभाजी भिडे यांना गुरुजी म्हणले जाते. मात्र, मी त्यांना गुरुजी म्हणणार नाही, असे मत जलील यांनी व्यक्त केले. कोणताही धर्म चुकीची शिकवण देत नाही. त्याला मानणारे लोक चांगले वाईट असतात. तरीही संभाजी भिडेंनी मुस्लीम समाज घातक असल्याचे वक्तव्य केले. माझ्यासाठी संभाजी भिडे हे कसाबसारखे आहेत. त्याने बंदुकीने दहशत माजवली, तर हे तोंडाने दहशत माजवत आहे, असा आरोप जलील यांनी केला.