औरंगाबाद - राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाविरोधातील लशींचा साठा कमी आहे. असे असले तरी ही राज्यात कोरोना लशीचा पुरेसा साठा असल्याचा दावा भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहीम जोरात राबवणे गरजेचे आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारीप्रमाणे जनजागृती करण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
भाजप खासदार डॉ. भागवत कराड म्हणाले की, कोरोनाचा आजार होऊ नये यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. गावागावात लसीकरण्याबाबत जनजागृती गरजेची असली तरी राज्य सरकार त्याबाबत कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यामुळे भाजप आता लसीकरण करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवणार आहे. सोमवारपासून या मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून देणार असल्याची माहिती भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली.
हेही वाचा-अकोल्यातील मेडिकलचा मदतीचा हात; ना नफा, ना तोट्यात विकत आहे रेमडेसिवीर इंजेक्शन
राज्याला लसींचा पुरेसा डोस-
कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना पुढील दोन दिवसांमध्ये लसींचा साठा संपला आहे. राज्याला कमी प्रमाणात लशींचा पुरवठा होत असल्याचा आरोप राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. मात्र हे आरोप खोटे असून राज्य सरकारला परिस्थिती हाताळता येत नाही असल्याचा आरोप केला आहे. देशात दोन कंपन्या लसींचा निर्मिती करत आहेत. केंद्राने एक कोटी सहा लाख लसी राज्याला पुरवल्या आहेत. ज्या प्रमाणे लसीकरण होत आहे त्याप्रमाणे लस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्य सरकार करत असलेल्या आरोपांमध्ये सत्यता नाही, असा दावा खासदार डॉ भागवत कराड यांनी दिला आहे.
हेही वाचा-राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने खास लोकांचे लसीकरण केले, भाजपचा आरोप
लॉकडाऊन लावण्याच्या आधी मदत जाहीर करा-
मागील मार्च महिन्यात कोरोनाचा धोका लक्षात घेता, केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र हा निर्णय घेत असताना केंद्राने मदत जाहीर केली. त्यात मोफत गॅस आणि रेशन दुकानांवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले होते. अशाच प्रकारच्या काही घोषणा राज्य सरकारने करून गोरगरिबांना मदत करावी त्यानंतरच लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार डॉ भागवत कराड यांनी केली..