ETV Bharat / city

मॉन्टी सिंगचा मारेकरी अटकेत; मित्रानेच केली हत्या - Monty Singh murder news

वेगवेगळ्या कारणातून वाद असलेल्या नजीकच्या मित्रानेच मॉन्टी सिंगची चाकुने भोसकून हत्या केल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांनी मॉन्टी सिंगचा मारेकरी कपिल रापते उर्फ राजे याला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अटक केली.

Monty Singh
आरोपी मॉन्टी सिंग
author img

By

Published : Oct 28, 2020, 8:52 PM IST

औरंगाबाद - वेगवेगळ्या कारणातून वाद असलेल्या नजीकच्या मित्रानेच मॉन्टी सिंगची चाकुने भोसकून हत्या केल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांनी मॉन्टी सिंगचा मारेकरी कपिल रापते उर्फ राजे याला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अटक केली. रापते हा राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्याला परभणीतून तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासून तो औरंगाबादेत राहत होता. त्याच्यावर मध्यंतरी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात देखील मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

असा आहे घटनाक्रम -

मिटमिटा भागातील पिस होम सोसायटीतील एका अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर २१ ऑक्टोबर रोजी एका राजकीय संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या मंटूश कुमार सिंग अनिल कुमार सिंग (३०, मुळ रा. कुंज, ओहारी, ता. नवादा, बिहार) याची निर्घुण हत्या केल्याचे समोर आले होते. तेव्हापासून कपिल रापते हा फरार झाला होता. तब्बल सहा दिवसानंतर छावणी आणि गुन्हे शाखा पोलिसांनी रापतेच्या दौंड येथून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी एका तरुणीला देखील छावणी पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच मॉन्टी सिंगच्या मोबाईलमधील संभाषणाचे रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. तेव्हापासून पोलीस रापतेच्या मागावर होते.

लॉकडाऊनच्या काळात मॉन्टी सिंगच्या प्रेयसीचे कपिलसोबत चांगलेच सूत जुळले होते. याकाळात मॉन्टी सिंग बिहारमध्ये अडकून पडला होता. तर त्याच्या फ्लॅटवर तब्बल तीन महिने त्याची प्रेयसी थांबलेली होती. याच काळात कपिल आणि प्रेयसी यांनी एकमेकांना मोबाईलवरील व्हॉटस्अपवर केलेले मॅसेज मॉन्टी सिंगच्या हाती लागले होते. त्यातून मॉन्टी सिंग हा प्रेयसीला वारंवार मारहाण करत होता. त्याचा राग प्रेयसीच्या डोक्यात होता. त्यामुळे तिने कपिलशी आणखीनच जवळीक साधली होती. त्यातूनच जीवलग मित्र असलेल्या कपिल आणि मॉन्टी सिंगमध्ये वारंवार वॉर सुरु होता. दरम्यान, एका ढाब्यावर मॉन्टी सिंगने मित्रांच्या मदतीने कपिलला बेदम मारहाणही केली होती. त्याचाही राग कपिलच्या मनात खदखदत होता. अखेर कपिलने अख्खी प्रॉपर्टी फूकेल पण मॉन्टी सिंगला संपवेल असा प्रणच घेतला होता. न्यायालयाने मारेकरी कपिल राजीव रापते (२६, रा. फ्लॅट क्र. ५, व्हिजन रेसीडेन्सी, रेणुकामाता कमानीजवळ, बीड बायपास) याला ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

मिटमिटा परिसरातील पिस होम सोसायटीतील मंटूशकुमार सिंग उर्फ मॉन्टी सिंग याची हत्या झाल्याचे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास उघडकीस आले होते. त्याचा मारेकरी कपिल रापते उर्फ राजे याला मंगळवारी पुण्यातील कुरकुंभ गावातून छावणी पोलिसांनी अटक केली. गेल्या अनेक वर्षापासून मॉन्टी सिंग आणि त्याच्या प्रेयसीचे संबंध होते. या दोघांची ओळख मॉन्टी सिंगच्या एका मित्राने करुन दिली होती. मात्र, काही वर्षे दोघेही गोडी गुलाबीने सोबत राहिले. पण दोन वर्षांपासून मॉन्टी सिंग आणि त्याच्या प्रेयसीमध्ये धुसफूस सुरू झाली. वेळप्रसंगी मॉन्टी सिंग तिला मारहाण करायचा. त्यामुळे ती मॉन्टी सिंगपासून दूर होण्याच्या प्रयत्नात होती. तिला कपिलने आधार दिला होता. त्यामुळे ती आता कपिलला आपला बॉयफ्रेंड असल्याचे मैत्रिणींना सांगायची. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात मॉन्टी सिंग बिहारमधील मुळगावी अडकून पडला होता. फ्लॅटची एक चावी प्रेयसीकडे असल्याने तिने तीन महिने फ्लॅटवरच बस्तान मांडले होते. मॉन्टी सिंग आणि प्रेयसीचा थेट संपर्क गेल्या तीन महिन्यात तुटला. त्यामुळे ती कपिलच्या आणखीनच नजीक गेली होती. मॉन्टी सिंगने दिलेल्या त्रासाची सगळी कथा तिने कपिलसमोर मांडली. त्यामुळे कपिलला तिच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली होती. त्यातच हत्येपुर्वी देखील मॉन्टी सिंगने प्रेयसीला मारहाण केली होती. त्याचा आणखी राग कपिलच्या मनात खदखदत होता. रात्री एकच्या सुमारास मॉन्टी सिंग मुकुंदवाडीत ओली पार्टी करुन फ्लॅटवर गेल्यानंतर कपिल तेथे गेला. दोघांनी सोबत जेवण केले. याचवेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यामुळे कपिलने लाकडी दांड्याने डोक्यात मारल्यानंतर पुन्हा चाकुने पोटात डाव्या बाजूला वार केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला होता.

काठीनेच मारहाण केल्याचा आव

छावणी पोलिसांनी पुण्यातील कुरकुंभ गावातून कपिलला मंगळवारी पकडले. त्यावेळी त्याची कसून चौकशी करण्यात आली. पण आपण केवळ काठीने डोक्यात वार केला होता. चाकु कोणी भोसकला याची मला कल्पना नसल्याचा तो आव आणत होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास केला असल्याने कपिलची बोलती बंद झाली. त्यामुळे त्याच्यासमोर गुन्हा कबुल करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. हत्येसाठी वापरलेला चाकु अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी कपिलचे दोन्ही मोबाईल जप्त केले आहेत. त्याच्या साथीदारांची देखील माहिती पोलिस घेत आहेत.

प्रेयसीची देखील होणार चौकशी.....

मॉन्टी सिंगच्या हत्येसंदर्भात त्याच्या प्रेयसीची देखील आता सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. तिच्यावरुन हा वाद विकोपाला गेला होता. अशी दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळेच न्यायालयात बाजू मांडताना तिच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तिची सखोल चौकशी करायची असल्याचे न्यायालयासमोर सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.