औरंगाबाद - एखादा कुत्रा भुकत असेल तर ( Sandeep Deshpande on Sanjay Raut ) आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तसेच आम्ही संजय राऊत यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करत आहोत, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande news Aurangabad ) यांनी सेना नेते संजय राऊत यांची तुलना कुत्र्यासोबत केली.
हेही वाचा - Amit Thackeray : अमित ठाकरेंनी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभा ठिकाणाची केली पाहणी, मनसे नेते तळ ठोकून
इम्तियाज जलील यांचा सत्कार करू - खासदार इम्तियाज ( Sandeep Deshpande on MP Imtiaz Jaleel ) यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित केले आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे यांना बोलावले आहे, त्याचे उत्तर ते देतील, मात्र जलील यांनी मस्जिदवरील अनधिकृत भोंगे काढावेत. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू. ते स्थानिक नेते आहेत, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
खैरे आऊट डेटेड मोबाईल - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यावर खैरे यांचा आदर करतो, मात्र ते आऊटडेटेड मोबाईल असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली. आता पूर्वीचा नोकिया मोबाईल चालत नाही. तो आपल्या घरातील शोभेची वस्तू आहे. तसेच खैरे यांचे झाले आहे. त्यांना आता काही किंमत नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
हेही वाचा - Imtiyaz Jaleel Aurangabad : 'राज ठाकरे यांनी सभेच्या आधी आमच्यासोबत इफ्तार पार्टीला यावे'