ETV Bharat / city

भाजपावर टीका करणे हा शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम - रावसाहेब दानवे - औरंगाबादेत जनसंवाद यात्रा

सध्या शिवसेना टीका करत आहे. मात्र तो त्यांचा एक कलमी कार्यक्रम असून आमच्यावर टीका करणे त्यांनी आता ते बंद करून त्यांनी राज्याचा विकास करावा, असा सल्ला असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे
author img

By

Published : Aug 20, 2021, 5:03 PM IST

Updated : Aug 20, 2021, 5:22 PM IST

औरंगाबाद - भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत शिवसेनेने आक्षेप घेत, ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याचे म्हटले आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपावर टीका करणे हा शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. ते औरंगाबादच्या जनआशीर्वाद यात्रे दरम्यान बोलत होते.

प्रतिक्रिया देतांना मंत्री रावसाहेब दानवे
औरंगाबादेत जनसंवाद यात्रा

भाजपाची जनआशीर्वाद यात्रा औरंगाबादेत दाखल झाली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत दोन दिवशीय यात्रा आयोजित करण्यात आली होती. करमाड येथून दोनही मंत्र्यांचे स्वागत सोहळे पार पडले. जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहचून केंद्राने केलेल्या कामांची माहिती देत असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे.

'यात्रेच्या माध्यमातून चांगले समर्थन'

भाजपाच्या जनशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून मोदीजींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. केंद्र सरकारने लोकांसाठी विविध योजना राबविले. त्यात कोविड परिस्थिती, स्वस्त धान्य सारख्या योजनेचा समावेश आहे. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात ही यात्रा गेली असून केंद्राच्या कामांचे कौतुक केले जात आहे. सध्या शिवसेना टीका करत आहे. मात्र तो त्यांचा एक कलमी कार्यक्रम असून आमच्यावर टीका करणे त्यांनी आता ते बंद करून त्यांनी राज्याचा विकास करावा, असा सल्ला असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जिल्ह्यात रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड या दोन मंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जागोजागी क्रेनवर मोठे हार लावून स्वागत सोहळे करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा निर्माण झाला होता. कोविड नियमांचे उल्लंघन देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा - बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ शुद्धीकरणाची कृती अशोभनीय; देवेंद्र फडणवीसांची टीका

Last Updated : Aug 20, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.