औरंगाबाद - देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली. रेल्वे रुळावरून जात असताना पाय अडकलेल्या महिलेच्या अंगावरून ताशी शंभर किलोमीटर वेगाने रेल्वे गेली. ( Jan Shatabdi express train runs over lady in Aurangabad ) मात्र महिला सुखरूप वाचली आहे. काही अंतरावर जाऊन रेल्वे थांबली आणि या महिलेला रेल्वे खालून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
जनशताब्दी खाली आली महिला - लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरा नगर येथील रहिवाशी असलेल्या 45 वर्षे महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ती काही वर्षांपासून सतत औषध गोळ्या आणि इंजेक्शन घेत असते. रविवारी सकाळी आपली पिशवी घेऊन घरातून बाहेर पडली मात्र त्यावेळेस रेल्वे रूळ ओलांडत असताना तिचा पाय अडकला आणि ती रुळावर पडली. त्याच वेळेस जनशताब्दी रेल्वे ताशी शंभर किलोमीटर वेगाने आली. महिला घाबरली आणि रुळावर झोपून गेली. ही बाब रेल्वे चालकाच्या लक्षात येईपर्यंत रेल्वे पुढे निघून गेली. काही अंतरावर रेल्वे थांबली तर महिला सुखरूप असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने महिलेला रेल्वे खालून सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.
हेही वाचा - दुकाने, आस्थापनावरील मराठी पाट्या लावण्याची मुदत आज संपणार