ETV Bharat / city

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद असणे दुर्दैवी - इम्तियाज जलील - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तारखेवरून होणारा वाद दुर्दैवी असून राजकीय पक्षांना एकत्र बसवून हा वाद मिटवला पाहिजे असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

खासदार इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील
author img

By

Published : Jan 27, 2022, 2:55 AM IST

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तारखेवरून होणारा वाद दुर्दैवी असून (Birthday of Chhatrapati Shivaji Maharaj) राजकीय पक्षांना एकत्र बसवून हा वाद मिटवला पाहिजे असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. (MP Jalil press conference) ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया

महाराजांच्या वंशजांच्या हस्ते करा लोकार्पण

शहरात क्रांतीचौक भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण तारखेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या देशात महाराजांचा मान आहे त्यांच्या जयंतीच्या तारखेवरून वाद होणे दुर्दैवी आहे. (Birthday of Chhatrapati Shivaji Maharaj) राजकीय फायद्यासाठी हा वाद कशासाठी, सर्व राजकीय पक्षांना एकत्र बसवून एक तारीख निश्चित करा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. तर पुतळा अनावरण करण्यासाठी महाराजांच्या वंशजांना मान द्यावा असे मतही खासदार जलील यांनी व्यक्त केले आहे.

खासदार जलील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

संत एकनाथ रंग मंदिर उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका वरचा भगवा नेहमी फडकत राहील असे वक्तव्य केले होते. त्यावर इम्तियाज जलील यांनी मिश्किल टीका केली आहे. त्यांना शुभेच्छा देतो, जनतेने त्यांना मत दिली पाहिजेत. कारण त्यांनी नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, सुखसिविधा दिल्या आहेत. जिल्ह्याला मिळालेले क्रीडा विद्यापीठ देखील दुसरीकडे पळवण्यात आले. सत्तेसाठी त्यांची लाचारी जनतेने पाहिली आहे. आता निवडणुका आल्याने, पुन्हा एकदा असे वक्तव्य केले जात असल्याची टीकाही इम्तियाज जलील यांनी केली आहे.

हेही वाचा - लोकलमधील सीसीटीव्हीला महिला का घाबरतात?, ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.