ETV Bharat / city

Bribe For Hall Ticket In Aurangabad : दहावीच्या विद्यार्थ्याला हॉल तिकीटासाठी लाच मागणारा संस्थाचालक ACB'च्या जाळ्यात

author img

By

Published : Mar 15, 2022, 9:51 AM IST

दहावी परीक्षेच्या हॉल तिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी खुद्द संस्था चालकासह लिपीक महिलेने लाच मागितल्याचा भयंकर प्रकार समोर आला. (Bribe For Hall Ticket In Aurangabad) या प्रकरणाची गंभीर दखल घेत अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने गारखेडा परिसरातील कलावतीदेवी चॅरिटेबल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व लिपिकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

औरंगाबाद - आजपासून सुरु होणाऱ्या दहावी परीक्षेच्या हॉल तिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी खुद्द संस्था चालकासह लिपीक महिलेने लाच मागितल्याचा भयंकर प्रकार समोर आला. (Maharashtra Ssc Exam 2022) या प्रकरणाची गंभीर दखल घेत अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने गारखेडा परिसरातील कलावतीदेवी चॅरिटेबल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व लिपिकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

३० हजार रुपयांची मागणी जवळकर यांनी केली होती

कलावतीदेवी चॅरिटेबल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संपत पाराजी जवळकर (६४,एस. पी जवळकर) यांना दहा हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. तर लिपीक सविता खामगावकर (५१) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. (Today 10TH EXAM 2022) दहावीच्या परीक्षेसाठी हॉल टिकीट आणि पेपरला मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी शिक्षण संस्था चालक जवळकरने केली होती. परंतु, विद्यार्थी व पालकांना जवळकरची मागणी मान्य नव्हती.

तक्रारदाराकडून तडजोडीअंती दहा हजार

विद्यार्थ्यांनी यासंदर्भात अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याशी संपर्क साधत तक्रार दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिपाली निकम, कर्मचारी सुनील पाटील, बाळासाहेब राठोड आणि सी. एन. बागुल यांनी सोमवारी दुपारी शिक्षण संस्थेत सापळा रचला. तक्रारदाराकडून तडजोडीअंती दहा हजार रुपये स्विकारताना जवळकर आणि लिपीक सविता खामगावकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे काही वर्षांपुर्वी जवळकर हे एसएससी बोर्डाचे सदस्य देखील होते.

हेही वाचा - Ukraine-Russia war : युक्रेन- रशिया युध्दाला 20 दिवस पुर्ण; आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.