ETV Bharat / city

आजारी पत्नीचा मृत्यू होताच पतीची गळफास घेऊन आत्महत्या - Mukundwadi Police

पत्नीच्या मृत्यूनंतर आत्महत्या केलेल्या भाऊसाहेबांनी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली होती.

मृत पती-पत्नी
author img

By

Published : Apr 28, 2019, 2:03 PM IST

औरंगाबाद - आजारी पत्नीचा मृत्यू होताच 65 वर्षीय वृद्ध पतीने पत्नीच्या साडीनेच घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ह्रदयद्रावक घटना आज पहाटे साडेतीन वाजता मुकुंदवाडीतील रामनगर भागात घडली आहे. विमलबाई भाऊसाहेब गोसावी (६० ) व भाऊसाहेब गोसावी (६५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

मृत भाऊसाहेब हे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स संघटनेचे माजी सचिव होते. पती, मुलगा,दोन नातवंडासोबत ते राजनगर भागात वास्तव्यास होते.

कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी केली होती आंदोलने-
भाऊसाहेबांनी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली होती. सध्या ते निवृत्त असल्याने घरीच होते. अनेक धार्मिक कार्यात ते अग्रेसर असायचे.त्यांची पत्नी विमलबाई या क्षयरोगाने आजारी होत्या. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा घराच्या वरच्या मजल्यावर झोपला होता. मात्र त्याला न उठविता पत्नीच्या निधनाची बातमी त्यांनी पैठण तालुक्यात राहणाऱ्या पुतण्याला फोनवरून कळवली. भाऊसाहेबांनी घरासमोरील झाडाला पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर पैठण येथून पुतण्याने फोन करून भाऊसाहेब यांच्या मुलाला आईच्या निधनाची बाब सांगितली. त्याने खाली जाऊन पाहिले असता आईचा मृत्यू झाला होता. तर त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवलंदार एस. ए. मनगटे करीत आहेत.

Intro:

आजार जडलेल्या पत्नीचा मृत्यू होताच 65 वर्षीय वृद्ध पतीने पत्नीच्या साडीनेच घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडेतीन वाजता मुकुंदवाडीतिल रामनगर भागात घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विमलबाई भाऊसाहेब गोसावी वय-60वर्ष, भाऊसाहेब हिरामण गोसावी वय-65वर्ष असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
Body:या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत भाऊसाहेब हे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स संघटनेचे माजी सचिव होते. त्यांनी कामगारांच्या हक्क साठी अनेक आंदोलने केली होती.सध्या ते निवृत्त झाल्याने घरीच होते.पती,मुलगा,दोन नातवंडा सोबत ते राजनगर भागात वास्तव्यस होते.आद्यत्मा कडे त्यांचा जास्त ओढा होता.अनेक धार्मिक कार्यात ते अग्रेसर असायचे.
त्यांची पत्नी विमलबाई या क्षयरोगाणे नेहमी आजारी रहायच्या आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनाने नैराश्य आल्याने
त्यांचा मुलगा घराच्या वरच्या मजल्यावर झोपला होता.मात्र त्याला न उठवता पत्नीच्या निधनाची बातमी पैठण तालुक्यात राहणाऱ्या पुतण्याला फोनवरून कळवली. व पत्नीची साडी घेऊन घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.पैठण येथून पुतण्याने फोन करून भाऊसाहेब यांच्या मुलाला आईच्या निधनाची बाब सांगितली.त्याने खाली जाऊन पाहिले असता आईचा मृत्यू झाला होता तर वाडीलने गळफास घेतल्याचे दिसले.या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास हवलंदार एस ए मनगटे करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.