ETV Bharat / city

पत्नीसोबत सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नीसोबत वाद झाल्याने पतीने रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील हडको परिसरात घडला आहे.

पत्नीसोबत सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नीसोबत सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पतीची आत्महत्या
author img

By

Published : Jun 15, 2021, 8:21 AM IST

औरंगाबाद - पत्नीसोबत सतत होणाऱ्या वादाला वैतागून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.

रागाच्या भरात घेतला गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडको, एन-१२ भागातील विवेकानंद नगरमधील विशाल हिरालाल खाजेकर (वय, २४) याचा पत्नीसोबत नेहमीच वाद व्हायचा. रविवारी देखील दोघांमध्ये भांडण झाले होते. रागाच्या भरात विशालने गळफास घेतला, ही बाब पत्नीच्या लक्षात येताच तिने विशालला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विशाल यांना मृत घोषीत केले.

पत्नीचा रुग्णालयातून काढता पाय

त्यानंतर त्याच्या पत्नीने सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार सांगितला व ती घाटीतून निघून गेली, असा आरोप विशालच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात विशालच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - रामाच्या नावावर खिसे भरण्याचे काम केले जात आहे, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.