ETV Bharat / city

अनलॉक वनमध्ये हॉटेल व्यावसायिक आर्थिक तोट्यात;'ऑनलाईन'मुळे बिघडला खर्चाचा ताळमेळ

author img

By

Published : Jul 2, 2020, 5:44 PM IST

Updated : Jul 2, 2020, 6:30 PM IST

हॉटेल चालवताना लागणारे जागेचे भाडे, लागणारी वीज, गॅस, आचारी आणि कर्मचारी यांचा लागणारा खर्च पाहता ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या ऑर्डरमधून उत्पन्न मिळणे शक्य नाही. हॉटेल सुरू करताना फक्त ऑनलाईन फूड देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून हॉटेल व्यवसाय तोट्यात जात आहे.

hotel
हॉटेल

औरंगाबाद - अनलॉक १ मध्ये अनेक व्यवसाय सुरू करण्यात आले. त्यात हॉटेल व्यवसायाचा देखील समावेश आहे. मात्र हॉटेल सुरू करताना फक्त ऑनलाईन फूड देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून हॉटेल व्यवसाय तोट्यात जात असल्याची माहिती औरंगाबादच्या हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

अनलॉक वनमध्ये हॉटेल व्यावसायिक आर्थिक तोट्यात;'ऑनलाईन'मुळे बिघडला खर्चाचा ताळमेळ

हॉटेल चालवताना लागणारे जागेचे भाडे, लागणारी वीज, गॅस, आचारी आणि कर्मचारी यांचा लागणारा खर्च पाहता ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या ऑर्डर यातून उत्पन्न मिळणे शक्य नाही. त्यामुळे जोपर्यंत हॉटेल व्यवसाय पूर्ववत होत नाही, तो पर्यंत खर्चाचा ताळमेळ लागणे शक्य होणार नाही. सरकारने स्थिती पूर्ववत होईपर्यंत हॉटेल व्यावसायिकांना लागणारा कर कमी केल्यास काही अंशी दिलासा मिळेल, असे मत औरंगाबादचे हॉटेल व्यावसायिक किशोर शेट्टी यांनी व्यक्त केलं.

एक जूनपासून मिशन बिगेन सुरू झाले. काही प्रमाणात व्यवहार सुरळीत करण्यासाठी काही अटी शर्ती लावून व्यवहार पुन्हा सुरू करायला परवानगी मिळाली. एका महिन्यात व्यवहार सुरळीत होत असले, तरी काही व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. ज्यात हॉटेल व्यवसाय येतो. हॉटेल व्यावसायिकांना ऑनलाईन पद्धतीने तयार अन्न विकण्यास परवानगी देण्यात आली. हॉटेल व्यवसाय सुरू झाले, मात्र व्यावसायिकांना फायदा मात्र होत नसल्याचे दिसून आले. नियमित येणारे ग्राहक कमी झाले. त्यात ऑनलाईन पद्धतीने तयार अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनी जवळपास 25 ते 30 टक्के कमिशन घेतात. उर्वरित रक्कम सात ते आठ दिवसांमध्ये हॉटेल व्यावसायिकांच्या खात्यात जमा करतात. मिळालेल्या पैश्यांमध्ये उत्पन्न कमी होते. त्यात हॉटेल चालवण्यास येणारा खर्च जास्त होत असल्याने तोटा अधिक होत असल्याचे शेट्टी म्हणाले.

जागेचे भाडे, वीजबिल, गॅस, स्वछता, कामावर असलेले कर्मचारी यांचे वेतन हा खर्च जास्त आहे. लॉकडाऊनच्या आधी रोज होणारी विक्री, आज होणारी विक्री यात जवळपास नव्वद टक्के फरक पडला आहे. त्यामुळे पहिल्या सारखे व्यवहार सुरळीत होईपर्यंत हॉटेल व्यावसायिकांना फायदा होणे शक्य नाही. ही स्थिती औरंगाबादेत नोंदणीकृत असलेल्या जवळपास बाराशे हॉटेल चालकांची आहे. या परिस्थितीत सरकारने हॉटेल व्यावसायिकांना लागणारा कर कमी केला, तर थोडा दिलासा मिळू शकेल असेही हॉटेल व्यावसायिक शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Jul 2, 2020, 6:30 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.