ETV Bharat / city

कोरोनामुळे फोनद्वारे नातेवाईकांना बोलण्याची कैद्यांना परवानगी

author img

By

Published : Jan 1, 2021, 8:02 PM IST

Updated : Jan 1, 2021, 8:25 PM IST

कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना बोलता यावे, यासाठी कारागृहात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कैद्याला आठवड्यातून दहा मिनिटे फोनद्वारे त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधता येत आहे.

हर्सुल कारागृह न्यूज
हर्सुल कारागृह न्यूज

औरंगाबाद - कोरोनामुळे प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही तरी बदल करावे लागले आहेत. कारागृहातदेखील काही नियमात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी हर्सुल कारागृहात काही निर्बंधही लावण्यात आले आहेत.

कोरोनाच्या संसर्गापूर्वी कैद्यांना कुटुंबीयांना भेटण्यासाठी काही नियमावली लावण्यात आली होती. त्यामध्ये प्रत्येक कैद्याला आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आठवड्यातून एक दिवस दिला जात होता. या एका दिवसात वीस मिनिटे ते आपल्या कुटुंबियांशी संवाद साधू शकत होते. टाळेबंदी लागू झाल्यामुळे कुटुंबीयांची भेट कैद्यांना घेता आली नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यामुळे कुटुंबीयांवर कैद्यांसाठी निर्बंध आजही कायम आहेत.

फोनद्वारे कुटुंबीयांशी बोलण्याची कैद्यांना परवानगी-

कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना बोलता यावे, यासाठी कारागृहात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कैद्याला आठवड्यातून दहा मिनिटे फोनद्वारे त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधता येत आहे. तुरुंग प्रशासनाचे कर्मचारी कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना फोन लावून देतात. त्यानंतर दहा मिनिटे कैदी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधू शकतात. हे नियम काही दिवस तरी असेच राहणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली आहे.

कोरोनामुळे कारागृहाच्या नियमात बदल

हेही वाचा-31 डिसेंबरला नार्कोटिक्स विभागाची मुंबईत छापेमारी; तिघे ताब्यात

कोरोनामुळे हर्सूल कारागृहातून 618 कैदी पॅरोलवर.
कोरोनाचा संसर्ग पाहता कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातुन 618 कैद्यांना पॅरोल देण्यात आली. यामध्ये सरकारी आदेशान्वये कोरोना आकस्मित अभिवचन रजेवर 352 कैद्यांना मुक्त करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार 104 कैद्यांना कोरोना पॅरोल रजा देण्यात आली. उच्चस्तरीय समितीमार्फत न्यायाधीन असलेल्या 162 कैद्यांना कोरोना आकस्मित जामीन मंजूर करण्यात आला. आजवर एकूण सहाशे 18 कैद्यांना पॅरोल देण्यात आली. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतरही जामीनदार न मिळालेल्या 44 कैद्यांना पॅरोल देता आली नाही अशी माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.

हेही वाचा-' राज्याच्या महसुलात चार महिन्यात ३६७ कोटी रुपयांची वाढ'

कारागृहातही झाली कैद्यांना कोरोनाची लागण...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्वच कारागृह बंद ठेवण्यात आले होते. जवळपास दोन ते तीन महिने कारागृहातून बाहेर येण्यास किंवा कारागृहात जाण्यास कोणालाही परवानगी देण्यात आली नव्हती. असे असले तरी औरंगाबादच्या हर्सूल कारागृह कारागृहामध्ये 61 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कारागृह प्रशासनाने 896 कैद्यांच्या आरोग्य तपासणी केली होती. बंदीसोबत कारागृह कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. 41 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुर्दैवाने यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 174 कारागृह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

कारागृहात पाळली जात नाही सोशल डिस्टन्सिंग-
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी चेहऱ्यावर मास्क आणि दोन व्यक्तींमध्ये विशेष अंतर ठेवण्याचा नियम सरकारने लावला आहे. कारागृहामध्ये कैद्यांनी मास्क वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. कैद्यामध्ये विशेष अंतर ठेवणे शक्य होत नाही. औरंगाबादचा हर्सूल कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता जवळपास 1,100 आहे. तरी कारागृहामध्ये आज घडीला 1285 कैदी ठेवण्यात आले आहेत. तर 618 कैदी पॅरोलवर सोडण्यात आले आहेत. एकूण संख्या पाहिली तर हर्सूल कारागृहात जवळपास 1800 कैदी शिक्षा भोगत आहेत. कैद्यांची संख्या अधिक असल्यामुळे कारागृहात सोशल डिस्टन्सिंग पाळत जात नाही. असे असले तरी कोरोनाच्या इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची माहिती कारागृहाच्या अधीक्षकांनी दिली.

Last Updated : Jan 1, 2021, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.