कानपूर India Batting Records : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी सामन्यात केवळ 35 षटकं खेळ झाली. यानंतर दोन दिवस पाऊस खलनायक राहिला आणि सामना थांबवण्यात आला. चौथ्या दिवशी बांगलादेशच्या खेळाडूंना भारतीय गोलंदाजांसमोर कोणतंही यश मिळाले नाही आणि संपूर्ण संघ 233 धावांवर बाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांनी T20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेट खेळलं आणि वेगानं धावा केल्या.
IN TEST CRICKET HISTORY:
— Johns. (@CricCrazyJohns) September 30, 2024
Fastest Team 50 - India
Fastest Team 100 - India
Fastest Team 150 - India
Fastest Team 200 - India
Fastest Team 250 - India
India Incredible under Rohit & Gambhir. 🇮🇳 pic.twitter.com/8eG4ZHnHVQ
भारतीय संघानं 8.22 च्या रनरेटनं केल्या धावा : भारतीय संघानं फलंदाजीला आल्यावर अवघ्या 34.4 षटकांत 285 धावा केल्या आणि डावात 8.22 च्या धावगतीनं धावा केल्या. यासह भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढला आहे. 2017 मध्ये, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानविरुद्ध कसोटी डावात 7.53 च्या धावगतीनं 32 षटकांत 241 धावा केल्या होत्या. सन 2022 मध्ये, इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध 35.5 षटकांत 7.36 च्या धावगतीनं 264 धावा केल्या होत्या. यात आम्ही रनरेटच्या संदर्भात त्या सामन्यांबद्दल बोलत आहोत, जेव्हा एखाद्या संघानं कसोटी डावात 200 पेक्षा जास्त धावा केल्या.
Innings Break!#TeamIndia have declared after scoring 285/9 in just 34.4 overs and have a lead of 52 runs 👏👏
— BCCI (@BCCI) September 30, 2024
Bangladesh 2nd innings coming up.
Scorecard - https://t.co/JBVX2gz6EN#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8tbuFb6GiT
भारताची खतरनाक फलंदाजी : बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघानं अशी फलंदाजी केली, जी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीच झाली नव्हती. भारतानं या डावात सर्वात वेगवान 50 धावा, सर्वात वेगवान 100 धावा, सर्वात वेगवान 150 धावा, सर्वात वेगवान 200 धावा आणि सर्वात वेगवान 250 धावांचा विक्रम मोडला. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगानं या धावांचा टप्पा गाठण्याचा रेकॉर्ड फक्त भारतीय संघाच्या नावावर झाला आहे. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघानं अवघ्या 3 षटकांत 50 धावा केल्या. हा नवा विश्वविक्रम आहे. यानंतर भारतीय संघानं 10.1 षटकांत 100 धावा, 18.2 षटकांत 150 धावा, 24.2 षटकांत 200 धावा आणि 30.1 षटकांत 250 धावा पूर्ण केल्या.
This is some serious hitting by our openers 😳😳
— BCCI (@BCCI) September 30, 2024
A quick-fire 50-run partnership between @ybj_19 & @ImRo45 👏👏
Live - https://t.co/JBVX2gyyPf… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/1EnJH3X5xA
सगळ्या फलंदाजांची आक्रमक फलंदाजी : पहिल्या डावात फलंदाजीला आल्यावर भारताच्या यशस्वी जयस्वालनं (51 चेंडूत 72 धावा) प्रथम कर्णधार रोहित शर्मासह (11 चेंडूत 23 धावा) अत्यंत आक्रमक सलामी दिली. यानंतर विराट कोहली (35 चेंडूत 47 धावा) आणि केएल राहुल (43 चेंडूत 68 धावा) यांनी ही आक्रमकता कायम ठेवली. शुभमन गिलनं देखील 36 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. अखेरीस आकाशदीपनं 5 चेंडूत 12 धावा ठोकल्या. त्यानं सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारले. अशाप्रकारे भारतीय संघानं अवघ्या 34.4 षटकांतच 285 धावा ठोकल्या.
🚨FASTEST 100 IN TEST CRICKET. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
India beat their own record for the fastest 100 in Test cricket - 103/1 in just 10.1 overs. 🇮🇳 pic.twitter.com/JM0qbhPxyr
बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीत भारताच्या धावा :
- कसोटीतील सर्वात जलद 50 धावा - 3 षटकं
- कसोटीतील सर्वात जलद 100 धावा - 10.1 षटकं
- कसोटीतील सर्वात जलद 150 धावा - 18.2 षटकं
- कसोटीत सर्वात जलद 200 धावा - 24.2 षटकं
- कसोटीतील सर्वात जलद 250 धावा - 30.1 षटकं
Fastest team fifty in Test cricket:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
India - 18 balls.
England - 26 balls. pic.twitter.com/93BLbfcpoH
कसोटी डावातील सर्वोच्च धावगती (200+ धावा) :
- 8.22 भारत विरुद्ध बांगलादेश, 2024 (34.4 षटकांत 285 धावा)
- 7.53 ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 2017 (32 षटकांत 241 धावा)
- 7.36 इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, 2022 (35.5 षटकांत 264 धावा)
- 6.80 दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, 2005 (50 षटकांत 340 धावा)
HISTORY WRITTEN BY ROHIT AND JAISWAL IN KANPUR. 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
INDIA 51/0 IN JUST 3 OVERS - THE FASTEST EVER IN TEST CRICKET..!!! 🤯 pic.twitter.com/Pmgldc2jME
कसोटीतील सर्वात जलद सांघिक अर्धशतक :
- 3.0 षटकं - भारत विरुद्ध बांगलादेश, 2024 आज
- 4.2 षटकं - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2024
- 4.3 षटकं - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1994
- 5.0 षटकं - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, 2002
- 5.2 षटकं - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, 2004
Fastest 50 in Tests - 3 overs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
Fastest 100 in Tests - 10.1 overs.
Fastest 150 in Tests - 18.2 overs.
Fastest 200 in Tests - 24.2 overs
Fastest 250 in Tests - 30.1 overs.
ALL ACHIEVED BY INDIA IN A SINGLE DAY, HATS OFF BOYS...!!! 🙇♂️🇮🇳 pic.twitter.com/oCg2TGMFCc
कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान सांघिक शतक :
- 10.1 षटकं - भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर 2024
- 12.2 षटकं - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पोर्ट ऑफ स्पेन 2023
- 13.1 षटकं - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश कोलंबो SSC 2001
- 13.4 षटकं - बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज मिरपूर 2012
- 13.4 षटकं - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कराची 2022
- 13.4 षटकं - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान रावळपिंडी 2022
- 13.6 षटकं - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पर्थ 2012
भारतासाठी कसोटीतील सर्वात जलद अर्धशतक (चेंडूंच्या बाबतीत) :
- 28 चेंडूंत, ऋषभ पंत विरुद्ध श्रीलंका, बेंगळुरु, 2022
- 30 चेंडूंत, कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, कराची, 1982
- 31 चेंडूंत, शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, 2021
- 31 चेंडूंत, यशस्वी जैस्वाल विरुद्ध बांगलादेश, कानपूर, 2024
- 32 चेंडूंत, वीरेंद्र सेहवाग विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2008
हेही वाचा :