औरंगाबाद - शिवसेनेचे सरकार असताना औरंगाबादचे नामांतर का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असतो. आता या मुद्द्यावर एक नवा प्रकार घडला आहे. शासकीय जीआरमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे शहराच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - VIDEO : दीड वर्षानंतर चित्रपटगृह अखेर सुरू, तरुणांचा चांगला प्रतिसाद
राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर म्हणून उल्लेख
राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे, त्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे, संभाजीनागरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
याआधी तयार करण्यात आला होता प्रस्ताव
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, ही मागणी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. मध्यंतरी शासन स्तरावरही विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, आता थेट शासनाच्या जीआरवरच संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा चर्चेला उधाण आला आहे. जीआर म्हणजे सरकारी आदेश, त्यात संभाजीनगर हा उल्लेख कसा? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे, शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत येणार, हे नक्की.
हेही वाचा - Reopening multiplex : चित्रपटगृह सज्ज, शुक्रवारपासून प्रेक्षकांना पाहता येतील चित्रपट