औरंगाबाद - शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत गणेश मंडळाकडून 'पाणी वाचवणे, वाहतूक नियम पाळणे' याबाबत अनेक जनजागृतीपर सजीव देखावे सादर करण्यात आले आहेत.
हेही वाचा - गणपती विसर्जन मिरवणूक: नाशिक ढोलच्या तालावर वाहतूक पोलिसांनी धरला ठेका
शहराचे ग्रामदैवत असणारा संस्थान गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर शहरातील गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होते. सध्या संस्थान गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यामुळे शहरातील अनेक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत संस्थान गणेशाच्या पुजनाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चंद्रकांत खैरेंनी धरला ठेका
शहरातील गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकत आहे. अनेक गणेश मंडळाचे ढोल पथक, झाँन्ज पथक या मिरवणुकीत सादरीकरण करीत आहेत. 55 वर्ष जुने मंडळ असलेला श्री गोगनाथ गणेश मंडळ नेहमीच त्यांच्या विविध देखाव्यातून जनजागृतीचे संदेश देत असतात. या मंडळाने आज (गुरुवारी) औरंगाबाद शहरातील वाहतूक परिस्थितीवर बोट ठेऊन नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, वाहने पार्किंगमध्ये उभी करावी, असा देखावा सादर केला. तसेच जलसंवर्धन, झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश दिला आहे.