औरंगाबाद - दिवाळी म्हटलं की लहणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या सणाची उत्सुक्ता असते. या सणासाठी मिळणाऱ्या सुट्या प्रियजणांच्या भेटी गाठी आणि फराळ. हे दिवाळीचे विशेष आकर्षण असते. तर याबरोबरच साहित्यिक फराळ असणाऱ्या दिवाळी अंकाचेदेखील यानिमित्ताने वाट पाहिली जाते. आजवर मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक बाजारात येतात. पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन देखील काही मुलांसाठीचे दिवाळी अंक तयार करण्यात आले आहेत. सोप्या आणि बोली भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, कार्टून, मुलांच्या मानसिक आणि भावनिक विचारांचा पुरेपुर विचार असलेले दिवाळी अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील. असे हे अंक बाजारात आले आहेत.
किमतीत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ -
खासबाब म्हणजे यंदाच्या दिवाळी अंकातही कोरोनामुळे शाळेऐवजी ऑनलाइन भरणाऱ्या क्लासच्या गंमती-जंमती, बालमनाला पडणारे प्रश्न त्याचे मनोरंजनातून ज्ञान देणारे उत्तर बालवाचकांसाठी देण्यात आले आहेत. दिवाळी अंकांची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता. विविध क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. तसा तो दिवाळी अंकांवरही झाला आहे. प्रिंटिंग आणि कागद महागल्याने दहा ते पंधरा टक्के दिवाळी अंकाच्या किंमतीत वाढ झाली आहे. असे असले तरी दिवाळी अंकाचा एक विशेष वाचक वर्ग आहे. तो वाचक वर्ग लक्षात घेऊन यंदाही दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत.
बालचित्रपटांवरील दिवाळी अंकही उपलब्ध -
यात मोठ्यांबरोबरच बालवाचकांसाठीचा किशोर, छोट्यांचा आवाज, छोटू, चिकु-पिकू, श्यामची आई, साधना युवा, साधना बालकुमार, मनशक्ती बालकुमार, फंडू हे दिवाळी अंक तसेच किलबिल सेलिब्रेशन हा डिजिटल दिवाळी अंक, गुलजार, डॉ. बाळ फोंडके, जयंत नारळीकर, डॉ. आनंद नाडकर्णी, माधुरी पुरंदरे, दासू वैद्य, प्रवीण दवणे, वीणा गवाणकर अशा मान्यवरांच्या लेखनाने बालदिवाळी अंक सजले आहेत. तर मध्यवर्ती मुले असलेला बालचित्रपटांवरील दिवाळी अंकही उपलब्ध आहे.
हेही वाचा - जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन