ETV Bharat / city

Insurance Company Claim : कोरोना झाला नसूनही विमा कंपनीकडे क्लेम, सिडको एमआयडीसी पोलिसांत तक्रार - कोटक इन्शुरन्स कंपनीचा क्लेम

आरोग्य विम्याच्या कक्षेत टाकण्यात आला इतकाच नाहीतर अनेक विमा कंपन्यांनी रुग्णांचे क्लेम सुद्धा दिले. मात्र, यातही घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघड झाला आहे. (Insurance Company Claim ) कोटक इन्शुरन्स कंपनीने याबाबत सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यात सरकारी रुग्णालयाचे कागदपत्र दाखवून 4 लाख 62 हजार रुपयांचे खोटे क्लेम उचलल्याच वास्तव समोर आले आहे.

सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशन
सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Mar 29, 2022, 4:06 PM IST

औरंगाबाद - नागरिकांना आरोग्य विमाचा फायदा व्हावा म्हणून कोरोना आजारही आरोग्य विम्याच्या कक्षेत टाकण्यात आला इतकाच नाहीतर अनेक विमा कंपन्यांनी रुग्णांचे क्लेम सुद्धा दिले. (insurance company Claim In Aurangabad ) मात्र, यातही घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघड झाला आहे. कोटक इन्शुरन्स कंपनीने याबाबत सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यात सरकारी रुग्णालयाचे कागदपत्र दाखवून 4 लाख 62 हजार रुपयांचे खोटे क्लेम उचलल्याच वास्तव समोर आले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

कोरोना मुळे दिली होती योजना - कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्यांना आरोग्य उपचार घेताना अडचण येऊ नये यासाठी इन्शुरन्स कंपन्यांनी थोड्या पैश्यांमध्ये इन्शुरन्स काढण्यात आले. या योजनेमुळे काही रुग्णांना फायदा देखील झाला. कोरोना झाल्यावर पैश्यांच्या अडचणीमुळे उपचार थांबले नाहीत. मात्र, अस असताना काही लोकांनी आजार झाला नसताना उपचाराची खोटी कागदपत्र सादर करून इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केली आहे.

अशी झाली फसवणूक - कोरोना उपचार घेताना रोज लागणाऱ्या खर्चापोटी विमाच्या डेली कॅश प्लॅन अंतर्गत पैसे देण्यात येत होते. कोणाला 60 हजार, कुणी 50 हजार तर काहींनी 40 हजारांचे क्लेम घेतले आहे. कंपनी ने याबाबत सरकारी हॉस्पिटल मध्ये जाऊन रजिस्टर तपासले तर त्यात ही या रुग्णांचे नाव आढळून आली नाही. मग या रुग्णांनी हे खोटे डिस्चार्ज कार्ड कुठून घेतले आणि नक्की फसवणूक कशी केली असा प्रश्न विमा कंपनीला पडला आहे.

विमाच्या माध्यमातून ही फसवणूक - यामध्ये 12 लोक आढळले आहे. त्यात एक विमा धारकाने 3 क्लेम आणि 2 जणांचे 2 क्लेम आहेत. ज्यामध्ये 7 जणांना पैसे देण्यात आले तर तीन जणांचे क्लेम प्रतीक्षेत आहेत. कोरोना काळात सर्रास लुट झालीये. आता या कंपनीने चौकशी केली आणि तक्रार दाखल केली त्यामुळे प्रकरण पुढे आलं आहे. मात्र, असे अनेक प्रकार झाले असल्याचे संशय आहे या मागे मोठे रॅकेट असल्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे, या रॅकेट च्या माध्यमातून खोटी बिल सादर करून आरोग्य विमाच्या माध्यमातून ही फसवणूक धक्कादायक आहे.. याबाबत आता गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरु करण्यात आला आहे.

हेही वाचा - Aditya Thackeray On Nanar Project : लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ - आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.