ETV Bharat / city

Encroachment Removed : ग्रामसेवीकेने रणरागिणीची भूमिका बजावल्याने अतिक्रमण हटले - Virgaon Gram Panchayat

Encroachment Removed तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतीच्या गाळ्यांसमोर काही व्यवसायकांनी विना परवाना गाळे अतिक्रमण ( Encroachment Removed ) करून बांधण्यात आले होते. गाळे हटविण्याबाबत व्यावसायिकांनी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मनाई हुकूम मागितला होता. यापूर्वीही यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता.

Encroachment Removed
Encroachment Removed
author img

By

Published : Sep 21, 2022, 5:09 PM IST

वैजापूर तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतीच्या गाळ्यांसमोर काही व्यवसायकांनी विना परवाना गाळे अतिक्रमण ( Encroachment Removed ) करून बांधण्यात आले होते. गाळे हटविण्याबाबत व्यावसायिकांनी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मनाई हुकूम मागितला होता. यापूर्वीही यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. ( Virgaon Gram Panchayat )तेच आदेश येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने कायम ठेवले होते. दरम्यान ग्रामपंचायतीच्या विरोधात दाखल करण्यात आलेले अपिलही न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबाबतचा मार्ग आता मोकळा झाला होता आणि अखेर सोमवारी हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

ग्रामसेवीकेने बजावली रनराघीनी सारखी भूमिका

अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी गाळे बांधले याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतीने गाळे बांधून व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिलेले होते. याच गाळ्यांसमोरील जागेवर काही व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी गाळे बांधले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने व्यावसायिकांना नोटीस बजावली होती. दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नोटीस देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे.

ग्रामपंचायतने अखेर हे अतिक्रमण जमीणदस्त केले तसेच ग्रामपंचायतीच्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार संबधितांना विभागीय आयुक्तांकडे आहे. त्यामुळे संबधित व्यावसायिकांचा दावा या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर तो चालविण्यासाठी बाधा येते, असा निर्वाळा न्यायालयाने दिला होता. त्यामुळे ग्रामपंचायतने अखेर हे अतिक्रमण जमीनदस्त केले. सदरील कारवाई विरगांव ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका एस. व्ही. शेटे व सहायक पो. नि. रोडगे व सरपंच कविता थोरात, सदस्य निलेश डहाके आदी यांनी अतिक्रमण काढण्यात भूमिका बजावली आहे.

सुरवातीला अतिक्रमण काढण्यासा फार अडचणी आल्या. वरिष्ठ पातळीवर मदत मागितली. ( gram sevika played role ) मात्र कुणीहीही प्रत्यक्षात आले नाही. काही महिलांनी विरोध केला. मात्र विरगांव पोलीस स्टेशनचे रोडगे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्णपणे मदत केली. तहसीलदार गायकवाड सर व गटविकास अधिकारी सर यांनी फोनद्वारे मार्गदर्शन केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.