औरंगाबाद : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे 15 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार Eknath Shinde Congress Entry होते, असा धक्कादायक आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire Allegations Eknath Shinde यांनी केला. त्यावेळी मातोश्रीवर त्यांच्या बंडाबाबत Eknath Shinde Rebellion माहिती मिळाली आणि ते माघारी फिरले, असेही खैरे यांनी सांगितलं. Eknath Shinde On Way to Congress
अडीच वर्ष आधी का गेला नाहीत - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते असा गौप्य स्फोट केला. त्यानंतर खैरे यांनी दुजोरा दिला. एकनाथ शिंदे यांना जर काँग्रेसची अडचण होती, तर अडीच वर्ष सरकारमध्ये का राहिले? असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. अडीच वर्षांपूर्वीच यांनी आपली भूमिका जाहीर करायला हवी होती आणि आम्हाला काँग्रेस सोबत यायचं नाही असं सांगून त्यांनी जायला पाहिजे होतं; मात्र आताच बंड हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठीच केलेलं आहे असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.
दसरा मेळाव्याला स्वखर्चाने कार्यकर्ते जाणार- दसऱ्याच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाईल. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून किती लोक जातील याचा आकडा आम्ही सांगू शकत नाही. मात्र, जे कार्यकर्ते जातील ते स्वखर्चाने स्वतःची भाजी भाकरी घेऊनच जातील असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे, त्यावर खैरे यांनी टीका केली.