औरंगाबाद - ग्राम दैवत असलेल्या संस्थान गणपती ( Sansthan Ganapati ) येथे पर्यावरण संवर्धनासाठी यंदा तुरटी पासून बाप्पाच्या मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. स्वयंभू पाषाणाची बाप्पाची चारशे वर्ष जुनी मूर्ती मंदिरात आहे. गणेश उत्सवात दरवर्षी तशीच हुबेहूब मूर्ती तयार करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून यंदा तुरटी ( Bappa idol from alum ) पासून तयार झालेली मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. ( Sansthan Ganapati Aurangabad )
पन्नास वर्षांपासून एकाच कुटुंबाला मिळतो मान - शहराच्या मध्यवस्तीत असलेलं संस्थान गणपती ट्रस्ट नेहमीच पर्यावरण संवर्धन करून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशउत्सव साजरा करत असतात. बाप्पाची पाशानरुपी मुर्तीची वर्षभर पूजा केली जाते. गणेशउत्सवात विसर्जन करण्यासाठी मूळ मूर्तीची हुबेउभ मूर्ती तयार करण्यात येते. शहरातील परिचित मूर्तिकार बगले कुटुंबियांना मागील पन्नास वर्षांपासून मूर्ती घडवण्याचा मान मिळतो. पर्यावरण पूरक उत्सव साजरा करत असताना 62 किलो फिटकडी आणि तुरटी यांच्या मिश्रणापासून बाप्पाची मूर्ती गणेश बगले यांनी साकारली आहे. जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राईड यांच्या सहकार्यातून मूर्ती साकारण्यात आली आहे. तुरटी पाण्यात पूर्ण विरघळते आणि पाणी देखील चांगले राहते. त्यामुळे पर्यावरण जपण्यास मदत होईल. असा उद्देश असल्याची माहिती मंदिर विश्वस्त सुनील चौधरी यांनी सांगितले.
दरवर्षी साकारली जाते पर्यावरण पूरक मूर्ती - औरंगाबादचे ग्रामदैवत ( Village Deity of Aurangabad ) असलेल्या संस्था गणपती मंदिरात दरवर्षी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. पर्यावरण वाचण्याचा संदेश देण्यासाठी अभिनव उपक्रम दरवर्षीच राबवला जातो. मागील काही वर्ष शाडू मातेची मूर्तीची स्थापना केली जात होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी मंदिरासमोरच एक मोठा हौद करून त्यामध्ये मूर्ती विसर्जित केली जायची. तर मूळ मूर्ती मिरवणुकीमध्ये शामिल केली जाते. यंदा पर्यावरण पूरक अशी तुरटीची मूर्ती स्थापन करू असं मूर्तिकार यांनी सांगितलं होतं. त्यानुसार पहिल्यांदाच तुरटीची मूर्ती स्थापन करत असल्याची माहिती संस्थान गणपती ट्रस्ट मंदिरातर्फे देण्यात आली. त्याचबरोबर मंदिरातर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. दहा दिवस समाजात जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर काम केलं जातं. त्यासंबंधीचे देखावे सादर केले जातात. तर दहा दिवस रोज दुपारी गोरबरीबांसाठी अन्नदान देखील केलं जातं अशी माहिती मंदिर ट्रस्ट कडून देण्यात आली.
हेही वाचा : Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशी २०२२ पूजा विधी ,महत्त्व आणि गणपती विसर्जन तारीख मराठीत