औरंगाबाद - इंधन आणि पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन नेहमी केले जाते. या आवाहनाला प्रतिसाद देत औरंगाबादेत राज्यात पहिल्यांदा एन्ड्रस ॲण्ड हाऊजर कंपनीत ई-बसचा वापर सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी दोन बसेस सुरू करण्यात आल्या असून या बस चार्ज करण्यासाठी सोलर प्रणालीचा वापर केला जाईल, अशी माहिती कंपनी व्यवस्थापकांनी दिली आहे.
दहा वर्षात वाचणार 350 हजार लीटर डिझेल -
पर्यावरण पूरक बसेसला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. ही बस संपूर्णपणे इलेक्ट्रिक, झिरो इमिशन असून लिथियम बॅटरीचा वापर या बसमध्ये करण्यात आला आहे. बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी अवघा दीड तास लागणार असून त्यामध्ये या बसेस दीडशे किलोमीटर एवढा पल्ला गाठू शकणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनामुळे दहा वर्षाच्या वापरानंतर साधारणतः 350 हजार लीटर डिझेल वाचवू शकतात असे एन्ड्रस ॲण्ड हाऊजर फ्लोटेकचे अध्यक्ष, संचालक कुलथु कुमार यांनी सांगितले.
कंपनी तर्फे गो-ग्रीन संकल्पना राबवली जाणार -
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात शाश्वत विकासावर भर दिला जात असून रिन्युएबल एनर्जी, सौलर एनर्जी, ग्रीन एनर्जी या क्षेत्रात भविष्यात अनेक समांजस्य करार होणार आहेत. नुकतेच जीएसडब्ल्यू कंपनीशीदेखील करार झाला असून वाळूज औद्योगिक वसाहतीतील येथील एन्ड्रस ॲण्ड हाऊजर कंपनीने ‘गो-ग्रीन’ संकल्पना राबवून मोठे पाऊल टाकले आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स बॅटरीवर चालणाऱ्या दोन बसेस उपलब्ध करुन दिल्या हा उपक्रम अन्य कंपन्यासाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त सचिव मुख्य सचिव (उद्योग) बलदेवसिंग यांनी येथे व्यक्त केले.
एन्ड्रस ॲण्ड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) च्या कंपनीत झालेल्या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, स्विझलँड येथील कॉन्सील जनरल ओथमार हर्डेगर, बजाजचे सी.पी.त्रिपाठी, उद्योगपती उल्हास गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. एन्ड्रस ॲण्ड हाऊजर ग्रुपचे सीओओ डॉ.अँड्रियास मेयर, सीईओ डाॅ. मिर्की लेहमन यांची ऑनलाईन उपस्थिती होती. एन्ड्रस ॲण्ड हाऊजर कंपनीत दोन ई-बसचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. यावेळी बसेस वरील निळा कापड हटविण्यात आला. तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी नवीन बसेसचे स्वागत केले.
पर्यावरण बचावासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा -
बलदेवसिग यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रात सध्या ग्रो-ग्रीन संकल्पना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. याशिवाय अनेक सामंजस्य कराराची अंमलबजावणी होणार आहे. औरंगाबाद सारख्या ठिकाणी या बसेस सुरु करुन एन्ड्रस ॲण्ड हाऊजर कंपनीने ग्रो-ग्रीन संकल्पनेची पायाभरणी केली आहे. याचे उदाहरण लक्षात घेऊन आता अनेक कंपन्यांनी ही संकल्पना राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगाजक उल्हास गवळी म्हणाले की, एन्ड्रस ॲण्ड हाऊजर ही कंपनी औरंगाबाद येथे आणताना या क्षेत्रातील उद्योजकांनी केलेले प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगो होते. एन्डरन्स नरेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. के. कुमार यांनी ग्रो-ग्रीन संकल्पनेविषयी माहिती दिली. याशिवाय या बसेस चालू करण्याबाबतचा उद्देश सांगितला. कॉन्सिल औरंगाबाद, महाराष्ट्रात सिझरलँडच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांना मेक इन इंडिया अंतर्गत प्रोत्साहन मिळत आहे.
हेही वाचा - चेन्नई येथून शिर्डीसाठी येणारे विमान उतरले थेट मुंबई विमानतळावर; वाचा, काय आहे कारण?