ETV Bharat / city

बालरोग तज्ज्ञाचा मंत्रिपदामुळे डॉक्टरांचा सन्मान, डॉ. कराड यांच्या बहिणीने व्यक्त केली भावना - aurangabad latest news

खासदार डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद मिळाल्याने सामान्य कार्यकर्त्यांसह सर्व डॉक्टरांचा सन्मान झाल्याची भावना डॉ. कराड यांची बहीण डॉ. उज्वला दहिफळे यांनी व्यक्त केली.

डॉ. उज्वला दहिफळे
डॉ. उज्वला दहिफळे
author img

By

Published : Jul 8, 2021, 4:37 PM IST

औरंगाबाद - खासदार डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद मिळाल्याने सामान्य कार्यकर्त्यांसह सर्व डॉक्टरांचा सन्मान झाल्याची भावना डॉ. कराड यांची बहीण डॉ. उज्वला दहिफळे यांनी व्यक्त केली.

बालरोग तज्ज्ञाचा मंत्रिपदामुळे डॉक्टरांचा सन्मान, डॉ. कराड यांच्या बहिणीने व्यक्त केली भावना

'मुंडे साहेबांच्या सच्चा कार्यकर्त्यांना मिळाला न्याय'
डॉ. भागवत कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते. त्यांच्यासोबत राहून त्यांनी समाजसेवेत सहभाग घेतला. त्यात नगरसेवक, दोन वेळा महापौर असा प्रवास करत पक्षाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे आणि संयमाने सांभाळत आपली छाप सोडली. त्याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांच्या निवडीने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले, असे मत डॉ. उज्वला दहिफळे यांनी व्यक्त केले.

'डॉक्टर पेशा असलेल्या कार्यकर्त्याला संधी दिल्याने उत्साह'
डॉ. भागवत कराड मराठवाड्यातील पाहिले बालरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर म्हणून त्यांची कारकीर्द एका उंचीवर होती. त्यावेळी त्यांनी राजकारणात लोकांच्या मदतीसाठी प्रवेश केला. एक डॉक्टर म्हणून ते यशस्वी होतेच मात्र राजकारणात देखील ते यशस्वी आहेत हे आज पाहायला मिळाले. डॉक्टर पेशा असलेल्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मंडळात स्थान दिल्याने डॉक्टरांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा डॉ. कराड यांची बहीण डॉ. उज्वला दहिफळे यांनी व्यक्त केली.

शेवटच्या क्षणापर्यंत होती धाकधूक -
दीड वर्षांपूर्वी डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेत खासदारकी जाहीर झाली. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू असताना डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद मिळेल असा विश्वास होता. मात्र बुधवार सकाळपर्यंत नाव जाहीर झाले नव्हते. त्यामुळे मनात धाकधूक होती. दुपारी अधिकृत नावाची घोषणा झाल्याने मोकळा श्वास घेतला. कुटुंबात उत्साह आणि आनंद आला असून डॉ. कराड मिळालेल्या संधीच सोनं करतील, असा विश्वास डॉ. उज्वला दहिफळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - मोदी मंत्रिमंडळ २.० : नवीन केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारला पदभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.