औरंगाबाद - आम्ही आता सत्तेत नाहीत मात्र देवाच्या कृपेने सत्तेत आलो तर नक्कीच बँकांचे पैसे बुडू देणार नाही असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. बँकांनी सरकार सोबत काम करणे कधीही उत्तम आणि फायद्याचे आहे. किमान सरकार दिवाळखोर होत नाहीत, मात्र यासाठी सरकार, कंत्राटदार आणि बँक एक मॉडेलची गरज आहे. त्यातून पायाभूत सुविधा आणि विकास गती घेईल, आणि आमची सत्ता आल्यावर आम्ही ते करू असे फडणवीस म्हणाले. बँक मंथन परिषदेसाठी फडणवीस औरंगाबादेत आले होते यावेळी ते बोलत होते.
परिषदेत सकारात्मक चर्चा, डॉ कराड यांना विश्वास -
देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या एक दिवसीय बैठकीच्या समारोप कार्यक्रमात बँक अध्यक्ष आणि उद्योजक यांच्यात कर्जवाटप आणि उद्योजकांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली, औरंगाबादेत असा कार्यक्रम पहिल्यांदा झाला आणि याचा नक्की फायदा होईल, असे मत केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले. 12 बँकांचे अध्यक्ष शहरात येणे हो मोठी गोष्ट आहे, देशात महाराष्ट्र राज्य बँकिंग क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला पहिल्या क्रमांकावर आणायचा प्रयत्न करणार असून, मुद्रा लोणबाबत ही नवे काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळे विषय चर्चा करून एक अहवाल आम्ही तयार केलाय आणि या मागण्या निर्मला सीतारामन यांना देणार असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.
'मुद्रा लोणमध्ये महाराष्ट्र होता पहिल्या क्रमांकावर'
मोदींमुळे ज्यांना बँक माहीत नव्हत्या, त्यांची बँक खाते उघडले आणि हे शक्य झालं, राजीव गांधी म्हणाले होते की, वरून 1 रुपया दिला तर जनतेपर्यंत 15 पैसे पोहोचतात हे सत्य होत, मात्र मोदीजी यांनी हे बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यांनी भागवत कराड यांचे खास अभिनंदन करत, अशा बैठक दिल्लीत व्हायच्या, त्या थेट औरंगाबादला आणल्या याच कौतुक आहे. त्यांना आपल्या पायाभूत सुविधा सांगितल्या, याचा नक्कीच आपला फायदा होईल, मुद्रा लोनमध्ये 22 टक्के एनपीए आहे, मात्र तरी हे योग्य आहे, एकेकाळी तो अशा योजनेत 100 टक्के असायचा. विकास प्रवाहात गोर गरिबांना आणणे गरजेचे आहे आणि ते बँकांना करायचे आहे. असेही फडणवीस म्हणाले, मुद्रा लोन वाटपात राज्य पहिल्या क्रमांकावर होते मात्र गेल्या वर्षभरात क्रमांक घसरला, आता का घसरला ते इथे सांगणार नाही मात्र बँक मदत करू शकतात. योग्य प्लॅन देऊन राज्य सरकारांनी ते पैसे घ्यायला हवे आणि नियोजन बद्ध विकास व्हायला हवा, आमच्या सरकार वेळी बँकांनी पायाभूत सुविधासाठी भरपूर पैसे दिले, असेही फडणवीस म्हणाले.
'रेल्वे विकासात राज्य सरकारने आपला वाटा द्यावा'
रेल्वे विकास बाबत केंद्र आणि राज्य प्रत्येकी 50 टक्के देतात. ते राज्याने बंद केले, याचा फायदा राज्यालाही होणार आहे. हे कळत कसे नाही, रेल्वे वाढली तर विकास वेग घेतो, सरकारला हे लक्षात घ्यावे लागेल. राज्यातले सुरू असलेले प्रोजेक्ट राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बंद झालेत, राज्य सरकारने याचा विचार करावा, विकास व्हावा वाटत असेल तर सरकारने अडमुठे धोरण सोडले पाहिजे आणि किमान मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासात अडसर आणणार नाही असेही फडणवीस म्हणाले, तर समृद्धी महामार्गावर समांतर ट्रेन होऊ शकते याचा निश्चित विचार व्हायला हवा, यातून या भागाचे सोने होईल असे फडणवीस म्हणाले.
'बँक परिषदेत दानवे यांची जोरदार भाषणबाजी'
बँकेच्या बैठकीत असलेल्या चर्चा सत्रात इंग्रजी भाषेत संभाषण केले गेले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी इंग्रजी म्हणावी तशी कळत नाही असे म्हणत काही उदाहरणे देत जोरदार कॉमेडी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पसरला होता. सगळे बोलत होते, आणि अनेक लोक माझ्याकडे बघत होते. त्यांना वाटत होते की रावसाहेब लक्ष देऊन ऐकतात आहे. मात्र इंग्लिश येत नाहीत हे मान्य करीत त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी भन्नाट किस्सा सांगितला. कराड साहेबांचे आभार मानतो, की देशातील सगळे बँकर त्यांनी औरंगाबादेत बोलावले. ही मोठी गोष्ट आहे आणि बँक नेटवर्क ग्रामीण भागात पसरवावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. समृद्धी महामार्गाला समांतर रेल्वे सुरू करायची असेल तर यासाठी 38 टक्के जागा लागणार आहे. मात्र आम्ही यावर विचार करतोय असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - सबका साथ सबका विकास हेच आमचे ध्येय - निर्मला सीतारामन