औरंगाबाद - येथील घाटी रुग्णालयात कार्यरत असलेल्या ब्रदरला (वॉर्ड बॉय) कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली असून गेल्या चार दिवसात कोरोनाची रुग्ण संख्या आता 11 वर पोहचली आहे.
रविवारी खासगी रुग्णालयाच्या एका डॉक्टरला तर उपजिल्हाधिकाऱ्याच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्याने शहरात रुग्ण वाढण्याची भीती अधिक दाट झाली आहे.
रविवारी औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मात्र त्या नंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मृत झालेल्या व्यक्तीने ज्या डॉक्टरकडे सर्वात प्रथम उपचार घेतले त्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. तर संबंधित डॉक्टर्स आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात डॉक्टरांना लागण झाल्याचे समोर आले. तर, दुसरी कडे उपजिल्हाधिकार्यांच्या चालकाला लागण झाल्याचं समोर आलं. दोन दिवसांपूर्वी सिडको भागात राहणाऱ्या महिलेला लागण झाल्याचं निष्पन्न झाले होते. त्या महिलेच्या वाहनाचा हा चालक असून उपजिल्हाधिकारी यांचा नेहमीच चालक सुट्टीवर असल्याने तो बदली कामावर उपजिल्हाधिकाऱ्यांची गाडी चालवत होता. काही दिवसांपूर्वी बदलीवर आलेला चालक त्या महिलेला घेऊन नाशिकला गेला होता. महिलेच्या संपर्कात आल्याने या चालकाला कोरोनाची लागण झाली. हा चालक गेल्या काही दिवसांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांची गाडी चालवत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत भीतीचे वातावरण पसरली असून अनेकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
CORONA VIRUS : औरंगाबादेत कोरोनाबाधितांच्या संख्या ११ वर, एक डॉक्टरही पॉझिटिव्ह - corona latest news
रविवारी खासगी रुग्णालयाच्या एका डॉक्टरला तर उपजिल्हाधिकाऱ्याच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्याने शहरात रुग्ण वाढण्याची भीती वाढली आहे.