औरंगाबाद - आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते हे लक्षात ठेवावे. आमची आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. हे साधं बोलायला विचारायला तयार नाहीत. आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चांकरून निर्णय घ्यायला हवा, आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. विधानसभेत राष्ट्रवादी विरोधीपक्ष नेते झाले, विधान परिषद नेता आम्हाला हवा होता. बसून निर्णय घेता आला असता. मात्र, आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी महाविकास आघाडी फुटींचे संकेत दिले ( nana patole on mahavikas aghadi ) आहेत.
आम्हाला विचारलं जात नसेल तर - नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, पहाटेचे सरकार पडले तेव्हा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते, म्हणून आम्ही सरकार मध्ये आलो. आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही, विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. आम्हाला विचारलं जात नसेल तर आम्ही चर्चा करू, असं वक्तव्य करत नाना पटोलेंनी महाविकास आघाडीत नाराजी नाट्य असून लवकरच आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
सरकार लवकरच पडेल - सत्तेचे वाटेकरी हे सगळे आहेत, हे जनतेचं सरकार नाही. मंत्रिमंडळ विस्तार करायला यांना ३९ दिवस लागले. आता विस्तार झाला तर खाते वाटपबाबत अद्याप स्पष्टता नाही. मलाईदर खात्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. राज्याचं सरकार नसून गुजराती नेत्यांसाठी हे सरकार आहे. आल्यावर लगेच गुजरातसाठी ट्रेन बाबत निर्णय घेत निधी देण्यात आला. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे ब्लॅकमेल सरकार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर करून सत्ता मिळवलेले हे सरकार असल्याने जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
हे सरकार लॉलीपॉप देतंय - तर, देशाच्या लोकशाहीला संपवण्याचे जे काम सुरुय, त्यासाठी गावागावात आमची ही यात्रा सुरू आहे. राज्यात शेतीची परिस्थिती चांगली नाही. शेतकऱ्याला चांगली मदत द्यायला हवी हे सरकार लॉलीपॉप देतंय. येणाऱ्या निवडणूक महाविकास आघाडीने लढावे की नाही, याबाबत निर्णय कार्यकर्ते घेतील, आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - Nitish kumar on Sushil modi भाजप नेते सुशील मोदी यांच्या दाव्यावर नितीश म्हणाले व्हॉट अ जोक