औरंगाबाद - शहरातील सिडको भागातील वसंतराव नाईक चौकात एक बेवारस एम एच १६ ए टी ६०३४ क्रमांकाची कार आढळून आली आहे. या गाडीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली होती. त्यामुळे या घटनेची माहिती तात्काळ बॉम्बशोधक पथकाला देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले व गाडीची तपासणी केली. तसेच गाडीची काच फोडून गाडीच्या आतली पाहणी केली. गाडीत काहीच आढळून न आल्याने सगळ्यांनी सुटकेची नि:श्वास टाकला आहे. पुढील कारवाईसाठी ही गाडी सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
हेही वाचा - पश्चिम बंगालमधील सर्व राजकीय सभा रद्द; राहुल गांधींचा कौतुकास्पद निर्णय