ETV Bharat / city

CM Eknath Shinde Announced : राज्यात लवकरच साडेसात हजार पोलीस पदांची भरती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - CM Eknath Shinde Announced

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर ( CM Eknath Shinde Visit to Aurangabad ) असताना, त्यांनी राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती ( Recruitment for 7500 posts of police ) करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर टी.व्ही. सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची देखील घोषणा केली.

CM Eknath Shinde Visit to Aurangabad
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर
author img

By

Published : Aug 1, 2022, 6:50 AM IST

Updated : Aug 1, 2022, 8:00 AM IST

औरंगाबाद : राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती ( Recruitment for 7500 posts of police ) करणार येणार असून, लवकरच सर्व विभागांच्या ८० हजार नोकर ( 80000 Employees of all Departments Recruitment ) भरती करण्यात येईल. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. औरंगाबाद शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी ( CM Eknath Shinde Visit to Aurangabad ) केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी सिल्लोड येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून मुख्यमंत्री सायंकाळी शहरात परतले. त्यांनी शहराच्या विविध भागांतील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्यामधे त्यांनी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर समर्थक आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्या कार्यालयात भेट देत नागरिकांशी संवाद साधला.

प्रवाहाच्या विरोधात लढलो : आम्ही जी लढाई लढलो ती सोपी नव्हती. एका विचाराची लढाई लढलो, आम्ही मंत्री होतो तरी त्यावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलो. ऐतिहासिक क्रांती म्हणून या घटनेकडे पहिले गेले. ३३ पेक्षा जास्त देशांनी ही घटना पाहिली. नवीन नवीन उपमा, टोपण नाव दिले, पण आम्ही घाबरलो नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत घाबरलो नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचे धाडस केले. बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा घाट घालण्यात येत होता.

भाजपसोबत युतीत लढलो तरी सत्ता स्थापना दुसरीकडे : आम्ही भाजपसोबत युतीत निवडणूक लढलो. त्यामुळे बहुमत मिळाले. लोकांना वाटले युतीचे सरकार स्थापन होईल मात्र उलट झाले. आमचे आमदार सहन करीत होते. एक वेळानंतर निर्णय घ्यावा लागतो. पक्षाचे खच्चीकरण थांबण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्णय घेतला. अस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

महारथीं विरोधात उभे राहिलो : सावरकरांच्या विरोधातील अवमान सहन करावा लागला. दाऊदसोबत राहणाऱ्यांना पाठीशी घालावे लागले. म्हणून निर्णय घेतला. सर्वांना भीती होती. रोज नवीन बातम्या येत होत्या, त्यामुळे आमदारांनादेखील भीती वाटत होती. सगळे महारथी एकीकडे होते. मात्र, पन्नास आमदार आले. याची कारणे शोधली पाहिजे. युतीचे सरकार स्थापन केले पाहिजे. मात्र, बाळासाहेबांनी सांगितले होत की, यांच्यासोबत कधी जायचे नाही. त्यांच्यासोबत जावे लागले. मात्र, पंतप्रधानांसोबत उभे राहिले केंद्र मदत करण्याची घोषणा आणि पाठिंबा त्यांनी दिला.

सर्वसामान्यांच्या हिताकरिता बनवले सरकार : सर्वांना न्याय द्यायचा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत. यासाठी आज बैठकीत निर्णय घेण्यात आला. सत्ता सर्वसामान्य लोकांची आहे. जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. पाण्याची योजना पूर्ण होईल. त्यासाठी निधी देण्याची घोषणा केली. शहरात आणि ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमची भूमिका लोकांनी स्वीकारली आहे, असे दिसून येतं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा : ED Arrested Sanjay Raut : संजय राऊत यांना 16 तासाच्या मॅराथॉन चौकशीनंतर ईडीकडून अटक

Last Updated : Aug 1, 2022, 8:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.