ETV Bharat / city

Citizens Complained Minister Bhumare About Officer : भुमरे यांच्या समोर नागरिकांनी केली गटविकास आधिकऱ्यांची तक्रार

author img

By

Published : Dec 14, 2021, 5:24 PM IST

रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) मंत्री संदिपान भुमरे (sandipan bhumre) आढावा बैठक आणि रस्ते उदघाटनाच्या निमित्ताने वैजापूर दौऱ्यावर होते. आढावा बैठकीच्यावेळी नागरीकांनी त्यांच्या समोर पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या (development officer) विरोधात तक्रार केली. ते योजनेची चुकीची माहिती सांगत अडचण निर्माण करत असल्याचा थेट आरोप यावेळी नागरिकांनी केला.

sandipan Bhumre
संदिपान भुमरे

वैजापूर: कोरोनाच्या संकटानंतर व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर प्रथमच सोमवारी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत वैजापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. निधीच्या गोंधळामुळे बैठक लक्षवेधी ठरली. कोरोना काळात निधी नाही. आहे त्या कामांच्या कार्यारंभ आदेशाचे त्रांगडे आहे. अशा गोंधळात वैजापुर पंचायत समितीचे हे आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. आता आहे त्या कामांसाठी धावपळ करण्यासह कुठलाच पर्याय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व सरपंचांनी आता आऊटपूट हवे अशी ओरड बैठकीत केली. यावेळी आमदार अंबादास दानवे, रमेश बोरणारे, उपनगराध्यक्ष साबेर खान, तहसीलदार राहुल गायकवाड़, गटविकास अधिकारी मोकाटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भूमरे यांनी सांगितले, की मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजनेत शेतकऱ्यांना रस्ते मिळावेत. यासाठी रोजगार हमी योजनांच्या निकषात अनेक बदल करण्यात आले आहेत. कुशल अकुशल कामांची अट शिथिल करुन कामांचे प्रमाण ६०:४० ऐवजी ४०:६० असे करण्यात येईल. म्हणजे कुशल कामांचे प्रमाण ४० वरुन ६० पर्यंत वाढवण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडे जास्तीत-जास्त प्रस्ताव सादर करावेत.यावेळी आमदार बोरनारे यांनी मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या आराखड्यात वैजापूर तालुक्याचा समावेश करण्यात यावा. मगरेगा अंतर्गत अकुशल व कुशल कामांच्या पध्दतीत बदल करून त्याचे प्रमाण 60: 40 करावे. अशा सूचना मांडल्या. भूमरे यांनी यावेळी रोहयोअंतर्गत शेतकऱ्यांना सध्या विहिरींसाठी तीन लाख रुपये दिले जातात. आता ते अनुदान वाढवून पावणेचार लाखापर्यंत करण्यात येईल. वैजापूर - गंगापूर तालुक्यांसाठी वाॅटर ग्रीड योजना अंमलात आणून घराघरात गोदावरीचे पाणी पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन भुमरे यांनी यावेळी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.