ETV Bharat / city

'काँग्रेसवाले ताप देतात तेव्हा मी भाजपावाल्यांना बोलावतो'; मुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या कानात केली कुजबुज

जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या काही काळ आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कानाजवळ जात काहीतरी बोलले. याबाबत दानवे यांना विचारले असता ते असे म्हणाले की, काँग्रेसवाले ताप देतात, तेव्हा मी भाजप वाल्याला बोलावतो, असे उद्धव ठाकरे यांनी माझ्या कानात सांगितले असे दानबे म्हणाले.

Chief Minister Uddhav Thackeray whispered in union state minister Raosaheb Danve's ear in Aurangabad
'काँग्रेसवाले ताप देतात तेव्हा मी भाजपावाल्यांना बोलावतो'; मुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या कानात केली कुजबुज
author img

By

Published : Sep 18, 2021, 4:12 AM IST

औरंगाबाद - 'काँग्रेसवाले ताप देतात, तेव्हा मी भाजप वाल्याला बोलावतो, असे उद्धव ठाकरे यांनी माझ्या कानात सांगितले' असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या काहीकाळ आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कानाजवळ जात काहीतरी बोलले होते. याबाबत दानवे यांना विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ -

जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळातील मित्रपक्षाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय भूकंप झाला. कार्यक्रम सुरू होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या कानाजवळ काहीतरी सांगितले. त्याबाबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या शैलीत वर्णन केले. सध्या तरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ताप देणार नाहीत. मात्र कधी दिलाच तर बसू असे मत दानवे यांनी व्यक्त केले.

मी आशावादी -

राजकारणात मी नेहमी आशावादी असतो आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या भाषणात ते आशावादी असल्याचे म्हणाले. त्यांनी वक्तव्य करून काही तास झाले आहेत. काही काळ जाऊ द्या सर्व कळेल असे रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा - ...येणाऱ्या काळात कोण सोबत येईल सांगता येत नाही; उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

अब्दुल सत्तार आणि दानवे यांची भेट -

मुख्यमंत्री औरंगाबाद दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होताच राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांची नेमकी काय चर्चा झाली. याबाबत दोन्ही नेते गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे आगामी काळात जुने मित्र पुन्हा एकत्र येतील का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे भाजपच्या नेत्यांना म्हणाले, भविष्यातील सहकारी.. त्यावर रावसाहेब दानवेंनी दिली सूचक प्रतिक्रिया

हेही वाचा - Marathwada Muktisangram Day - निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार, मुख्यमंत्र्यांची औरंगाबादमध्ये घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.