औरंगाबाद - आता आठ वाजताचा भोंगा बंद झाला आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना समर्थक ( CM commented on Sanjay Raut arrest ) आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आवाज येतोय ना असा प्रश्न विचारत आठ वाजताचा भोंगा बंद झाला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंनी संजय राऊत यांनी नाव न घेता लगावला आहे.
नागरिकांचे मानले आभार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी मध्यरात्री देखील त्यांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवाद साधत असताना इतक्या रात्री आपल्यासाठी थांबलात त्यामुळे त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, प्रत्येकवेळी त्यांनी आपली भूमिका योग्य होती ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावे लागले. आपली भूमिका योग्य असल्यामुळेच आपल्याला लोकांचे प्रेम मिळत आहे असही ते म्हणाले आहेत. आता जनतेच्या विकासासाठी काम करणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित त्यांना दिले.
पंतप्रधानांचे मानले आभार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत. सत्ता परिवर्तन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या विकासात मदत करण्याचे आश्वासन दिल आहे असे त्यांनी सांगितले आहे. हे सरकार सर्व सामान्य नागरिकांचे सरकार असणार आहे. त्यामुळे मिळालेल्या मदतीमुळे महाराष्ट्राची वाटचाल चांगली करण्यास मदत होईल. तसे, आपण निश्चित प्रयत्न करू असही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल