ETV Bharat / city

औरंगाबादचे नाव संभाजीनगर लिहिले तर मिर्ची लागली का?, खैरेंकडून खोडसाळपणाचे समर्थन

औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील फलकावर काही समाजकंटकांनी औरंगाबाद नाव खोडून संभाजीनगर लिहिले. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडले आहे.

चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Jul 3, 2019, 4:30 PM IST

औरंगाबाद - रेल्वे स्थानकाच्या फलकावरील औरंगाबाद नाव खोडून संभाजीनगर असे नाव काही समाजकंटकांनी २ दिवसांपूर्वी लिहिले. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडले आहे. मात्र, तरीही शिवसेनेने याचे समर्थन केले आहे. संभाजीनगर नाव लिहिल्याने कोणाला मिर्ची लागली का? असा प्रश्न माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

चंद्रकांत खैरे

शिवसेना १९८८ पासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करणार असे आश्वासन मतदारांना देत निवडणूक लढवत आहे. मात्र, इतक्या वर्षांमध्ये शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपला नामकरण करता आले नाही. त्यातच औरंगाबादेत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेचे स्वप्न पुढील पाचवर्षं तरी पूर्ण होणे शक्य नसल्याची चर्चा रंगत असताना औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील फलकावर काही समाजकंटकांनी औरंगाबाद नाव खोडून संभाजीनगर लिहिले. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडले आहे. मात्र, तरीही शिवसेनेने याचे समर्थन केले आहे.

औरंगाबादला संभाजीनगर हे नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते, तसा ठराव देखील पास झाला होता, अशी माहिती खैरे यांनी माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यापासून शहरातील वातावरण खराब होत चालल्याचा आरोप केला. त्यांनी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना याबाबत एक निवेदन दिले आहे. त्यात लोकसभा निवडणूक झाल्यापासून हिंदू बांधवांवर हल्ले होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शहरात कोणी अशांतता पसरवली तर शिवसेनेने हातात बांगड्या भरल्या नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:औरंगाबादचे नाव संभाजीनगर लिहिले तर मिर्ची लागते का अशी संतप्त प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देत नव्या वादाला तोंड फोडलंय. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिल होत, तसा ठराव देखील पास झाला होता अस विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं.Body:दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद रेल्वे स्टेशन वरील फलकांवर औरंगाबाद नाव खोडून संभाजीनगर अस नामकरण काही समाजकंटकांनी केलं होतं. यावर बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली.Conclusion:शिवसेना 1988 पासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करणार अस आश्वासन मतदारांना देत निवडणूक लढवत आहे. मात्र इतक्या वर्षांमध्ये शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपला नामकरण करता आलं नाही. त्यातच औरंगाबादेत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेचे स्वप्न पुढील पाचवर्षं तरी पूर्ण होणे शक्य नसल्याची चर्चा आता रंगत असताना औरंगाबाद रेल्वे स्थानकावर समाजकंटकांनी फलकावर लिहिलेले औरंगाबादनाव खोडून संभाजीनगर लिहिले. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडले असले तरी शिवसेनेने मात्र याच समर्थन केल आहे. संभाजीनगर नाव लिहिल्याने कोणाला मिर्ची लागली का असा प्रश्न माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. औरंगाबादच नाव संभाजीनगर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, आणि तसा ठराव देखील पास केला होता. अशी प्रतिक्रिया खैरे यांनी माध्यमांना दिली. लोकसभा निवडणूक झाल्यापासून शहरातील वातावरण खराब होत चालल्याचा आरोप शिवसेनेने केला. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिल त्यात लोकसभा निवडणूक झाल्यापासून हिंदू बांधवांवर हल्ले होत असल्याचा आरोप करण्यात आला असून शहरात अशांतता कोणी पसरवली तर शिवसेनेने हातात बांगड्या भरल्या नसल्याचा इशारा देखील शिवसेनेने दिलाय.
(बातमी एडिट करून टाकली आहे)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.