औरंगाबाद - भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना बुधवारी ( Bjp workers taken in custody ) पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Bjp workers taken in custody by police in Aurangabad ) यांची औरंगाबाद येथे काल सभा झाली. त्यांच्या रॅली पूर्वी ही कारवाई करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याकडे रिकामी भांडी ( Utensil throw plan ) फेकण्याच्या बेतात हे कार्यकर्ते होते, अशी माहिती एका वरिष्ट अधिकाऱ्याने दिली.
भाजपचे औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे आणि पक्षाच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी याआधीच ठाकरे यांना शहरातील पाणी समस्यांबाबत निवेदन देणार असल्याचे सांगितले होते. पण नंतर ते एका हॉटेलमध्ये आले, जिथे मुख्यमंत्री थांबणार होते. नंतर हे भाजप कार्यकर्ते ठाकरे यांच्या ताफ्यावर रिकामी भांडी फेकण्याचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांची रॅली संपल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - Aurangabad Crime : इतरांशी बोलू नको, तरुणाची युवतीला जिवे मारण्याची धमकी