औरंगाबाद - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही, त्यामुळे औरंगाबादचे नामकरण 'संभाजीनगर'झालेच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. यापार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आम्ही औरंगजेबाचे वंशज नसल्याने औरंगाबादचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच संभाजीनगर या मागणीवर आमची भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
-
महाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत.औरंगजेबाचे नाहीत,त्यामुळे औरंगाबादचे नामकरण "संभाजीनगर"झालंच पाहिजे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलhttps://t.co/9EqQbdlosV
">महाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत.औरंगजेबाचे नाहीत,त्यामुळे औरंगाबादचे नामकरण "संभाजीनगर"झालंच पाहिजे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 29, 2020
-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलhttps://t.co/9EqQbdlosVमहाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत.औरंगजेबाचे नाहीत,त्यामुळे औरंगाबादचे नामकरण "संभाजीनगर"झालंच पाहिजे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 29, 2020
-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलhttps://t.co/9EqQbdlosV
हेही वाचा - 43 वे UNHRC सत्र : पाकिस्तानी लष्कर हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू, पोस्टर झळकले
शेतकरी कर्जमाफी म्हणजे 'नाचता येईना, अंगण वाकडे' आहे, अशी टीका पाटील यांनी केली. पाथर्डी शेतकरी आत्महत्या प्रकरणावर बोलताना, संबंधित प्रकार दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच भाजप सरकारच्या काळात आम्ही प्रयत्न केले, मात्र, आता या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, भाववाढ मिळणार नाही, आणि ही परिस्थिती अशीच राहणार, असे पाटील म्हणाले. तसेच या सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.