ETV Bharat / city

औरंगाबाद पालिका रस्त्यावरील बेवारस वाहनांवर ऑगस्टमध्ये करणार कारवाई

महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या दालनात रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस व भंगार वाहने जप्त करण्याबाबत महानगरपालिका, आरटीओ, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत बेवारस, भंगार वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aurangabad Municipal Corporation take action on unattended vehicle
बेवारस वाहनांवर ऑगस्टमध्ये पालिका करणार कारवाई
author img

By

Published : Jul 26, 2021, 11:01 AM IST

औरंगाबाद - रस्त्याच्या कडेला बेवारस, भंगार वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर २ ऑगस्ट पासून महिनाभर कारवाई मोहीम राबवण्यात येणार आहे. सदरील वाहनावर सात दिवसांची नोटीस लावून त्यांनी स्वतः वाहन उचलली नाही तर मनपातर्फे सात दिवसानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झाली बैठक -

महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या दालनात रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस व भंगार वाहने जप्त करण्याबाबत महानगरपालिका, आरटीओ, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, रविंद्र निकम, कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुरेश वानखेडे, सहाय्यक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, मनपा कार्यकारी अभियंता रस्ते बी.डी. फड, कार्यकारी अभियंता वाहने डी. के. पंडित, महानगरपालिकेचे सर्व वार्ड अधिकारी व वार्ड अभियंता, पद निर्देशित अधिकारी व अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दोन ऑगस्टपासून महिनाभर होणार कारवाई -

रस्त्याच्या कडेला बेवारस व भंगार वाहने उभे करून वाहतुकीस तसेच साफसफाई कामात अडथळा निर्माण होत आहे. गॅरेज वाले, बेवारस, भंगार, वाहनधारकास सात दिवसाची नोटीस बजावून सात दिवसात वाहने न उचलल्यास सात दिवसानंतर सदरील वाहने जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. सदरील वाहने जप्त करण्याची कारवाई येत्या २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्यात येणार असून ही मोहीम महिनाभर चालणार आहे. या मोहिमेत महानगरपालिका, पोलीस व आरटीओ यांच्यावतीने संयुक्तपणे मोहीम राबवण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेला बेवारस व भंगार तसेच तात्पुरती उभे करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्याचे आदेश पथकाला प्रशासकांनी दिले.

कारवाई करताना होईल व्हिडिओ रेकॉर्डिंग -

रस्त्याच्या बाजूला असणारी बेवारस वाहनांवर कारवाई करत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून गाडी नंबरसह अहवालाची सीडी तयार करून मनपा उपायुक्त यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच पंधरा दिवसानंतर सदरील अहवाल आरटीओ यांना पाठवून संबंधित वाहनाचा व वाहनधारकाचा वाहन नोंदणी परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजावून या वाहनावर कारवाई करण्यात येईल. वाहने उचलण्यासाठी होणारा खर्च त्याच वाहन धारकाकडून वसूल करावा, रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बेवारस व भंगार वाहनाबाबतच्या कारवाई करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त यांना कळविण्यात यावे, त्यामुळे महानगरपालिका, पोलीस, आरटीओ यांच्या संयुक्तपणे ही मोहीम यशस्वीपणे राबविणे शक्य होईल, असे मनपा प्रशासक यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.